Veer Savarkar : मार्सेलिसची उडी ही युरोपला हादरवून टाकणारी सावरकरांची अजरामर समुद्रझेप – ह.भ.प. गणेश महाराज करंजकर

190
Veer Savarkar : मार्सेलिसची उडी ही युरोपला हादरवून टाकणारी सावरकरांची अजरामर समुद्रझेप - ह.भ.प. गणेश महाराज करंजकर
Veer Savarkar : मार्सेलिसची उडी ही युरोपला हादरवून टाकणारी सावरकरांची अजरामर समुद्रझेप - ह.भ.प. गणेश महाराज करंजकर

लंडनमध्ये स्वा. सावरकरांना अटक होणे, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ब्रिटिशांच्या तावडीतून सुटण्यासाठी त्यांच्या बोटीतून फ्रान्सच्या मार्सेलिस बंदराजवळ उडी घेणे आणि त्यानंतर फ्रान्समध्ये ब्रिटीश पोलिसांनी त्यांना पुन्हा पकडणे, या सर्व घटनांनी संपूर्ण युरोपला हादरून टाकले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ८ जुलै १९१० या दिवशी मोरिया बोटीतून समुद्रात धाडसी उडी मारली आणि ब्रिटीश सत्तेविरुद्धच्या संघर्षांची लाट जगाच्या कानाकोपर्‍यात पोचली. जिवाची पर्वा न करता भर समुद्रात मारलेली ही उडी त्रिकालखंडात तर गाजलीच, त्याशिवाय त्यामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याची रणदुदुंभी जगामध्ये निनादली, असे उद्गार ह.भ.प. गणेश महाराज करंजकर यांनी काढले. (Veer Savarkar)

(हेही वाचा – राज्य शासनाच्या प्रचार प्रसार समन्वयकपदी प्रा. डॉ. Jyoti Waghmare यांची नियुक्ती)

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी फ्रान्सच्या मार्सेलिस बंदरात मारलेल्या साहसी उडीला ८ जुलै रोजी ११४ वर्ष पूर्ण झाली. त्या निमित्ताने भगुरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समुहाच्या वतीने भगूर येथील नूतन विद्या मंदिर व उच्च माध्यमिक विद्यालय येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्या वेळी भगूररत्न गणेश महाराज करंजकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी व्यासपिठावर शाळेचे उपमुख्याध्यापक अनिल कवडे , जितेंद्र भावसार, मनोज कुवर यांच्यासह ५०० विद्यार्थी उपस्थित होते.

New Project 9 1

मार्गदर्शन करतांना महाराज म्हणाले की, या धाडसामागे स्वातंत्र्यीवर सावरकरांनी बोटीतून मार्सेलिसच्या समुद्रात उडी घेऊन पोहत जाऊन फ्रान्सचा किनारा गाठला, तो आंतरराष्ट्रीय कायद्याचा लाभ घेऊन ब्रिटिशांच्या कैदेतून सुटका करून घेण्यासाठी. याद्वारे त्यांना भारतभूमीच्या सुटकेसाठी मोकळे राहून अन्य देशांत अखंडपणे कारवाया करायच्या होत्या. ब्रिटिशांच्या कैदेत अडकून राहिल्यास स्वातंत्र्यलढ्यात खंड पडेल आणि देशाचे स्वातंत्र्य लांबणीवर जाईल, याच विवंचनेतून त्यांची ती ‘समुद्रझेप’ होती. तो पळपुटेपणा नव्हता; तर तो एक डावपेच होता. ते एक मोठे धाडस होते.

या वेळी समूहाचे भूषण कापसे, सुनील जोरे, संभाजी देशमुख, दिगंबर करंजकर यांनी मान्यवरांचा सत्कार केला. सूत्रसंचालन विलास म्हसाळ सर, प्रास्ताविक ललित भदे यांनी केले, तर आभार आकाश नेहेरे यांनी मानले. या प्रसंगी शाळेचे कर्मचारी उपस्थित होते.

चौकातील पुतळ्यांना अभिवादन

New Project 8

भगुरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समूहाच्या वतीने सकाळी १० वाजता भगूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस शामजी गणोरे यांनी, तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मूर्तीस शिवसेना नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख विजय आप्पा करंजकर व चंदु नाना गोडसे यांनी पुष्पहार अर्पण करून वंदन केले. त्यानंतर सावरकर स्मारकात नितिन करंजकर व सुनील जोरे यांनी सावरकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. या वेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जयघोष करण्यात आला. या वेळी योगेश बुरके, प्रशांत लोया, आशिष वाघ, मनोज कुवर, कैलास भोर, नीलेश हासे, प्रवीण वाघ, गणेश राठोड आदी सावरकरप्रेमी उपस्थित होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.