भारतातच नव्हे तर विश्वातील हिंदूंच्या रक्षणासाठी Vishwa Hindu Parishad कटिबद्ध

39
भारतातच नव्हे तर विश्वातील हिंदूंच्या रक्षणासाठी Vishwa Hindu Parishad कटिबध्द
भारतातच नव्हे तर विश्वातील हिंदूंच्या रक्षणासाठी Vishwa Hindu Parishad कटिबध्द

मुंबईतील कॅनडा दुतावासा (Embassy of Canada) बाहेर कॅनडातील हिंदू मंदिरांवर खलिस्तानवादी अतिरेक्यांनी दहशतवादी हल्ल्याचा निषेधार्थ विश्व हिंदू परिषद (Vishwa Hindu Parishad) अंतर्गत बजरांगदलाच्या कार्यकर्त्यांनी नोव्हेंबर 6 रोजी दुपारी 4 वाजता शांती प्रिय पद्धतीने आपला विरोध नोंदवला. (Vishwa Hindu Parishad)

या वेळी पत्रकारांना संबोधित करीत असताना विहिंप प्रवक्ते व कोंकण प्रांताचे (Konkan Province Vishwa Hindu Parishad) सह मंत्री श्रीराज नायर (Sriraj Nair) यांनी म्हटले, हिंदू आणि शीख समाज हे वेगळे नाहीत. भारताचे वाढते जागतिक प्रभुत्व पाहता मुद्दाम भारताला बदनाम करून देशात अशांती निर्माण करण्यासाठी कॅनडातील भारतीय वंशाच्या मुलांचे ब्रेन वॉश करून मुद्दाम त्यांच्या कडून भारत विरोधी कृत्ये करवून घेतली जात आहे. हिंदू जगात कोणत्याही देशात आला तरी त्याचे त्या देशाच्या प्रगती मध्ये मोठे योगदान असते. अनेक वर्षांचे भारत कॅनडा देशांचे चांगले संबंध पाहता आमचे कॅनडा देशाशी कोणताही द्वेष नाही या उलट आम्ही विश्व हिंदू परिषदे द्वारे कॅनडा सरकारला निवेदन करतो की तुमच्या देशात होणारे हिंदू मंदिरावरील हल्ले त्वरित थांबवावे तसेच समाज विधातक शक्तीचा त्वरित योग्य बंदोबस्त करावा.

Untitled design 3

(हेही वाचा – IPL Mega Auction : आयपीएल लिलावात भाग घेणारा पहिला इटालियन खेळाडू थॉमस ड्राका कोण आहे?)

शांती प्रिय निदर्शना नंतर स्थानिक पोलिसांनी बजरंगदल (Bajrang Dal) संयोजक रणजित जाधव सहसंयोजक गौतम रावरिया वि.हिं.प. शहर विभाग मंत्री राजीव चौबे व अन्य आंदोलकांना ताब्यात घेऊन दादर पोलीस स्टेशनला नेले व त्या नंतर सर्वांना सोडुन देण्यात आले.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.