Marathi Bhasha Din च्या निमित्ताने ‘गुणीजनां’नी जागवल्या वीर सावरकरांच्या आठवणी

Marathi Bhasha Din : मराठी कलाकारांच्या समुहाने केली मराठी साहित्य आणि भाषा यांविषयी साधक-बाधक चर्चा

43

२७ फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन ! या निमित्ताने ‘गुणीजन’ (Gunijan) याकेली. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे ‘छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत’ पुरस्कार सुरु करण्यात आला आहे. यंदाचा हा पुरस्कार स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Veer Savarkar) यांच्या ‘अनादी मी अनंत मी…’ या गीताला देण्यात येणार आहे. या औचित्याने या गाण्याच्या इतिहासालाही उजाळा देण्यात आला. दादर, मुंबई येथील आस्वाद उपाहारगृहात हा अनौपचारिक संवाद रंगला. (Marathi Bhasha Din)

(हेही वाचा – Veer Savarkar यांच्या ५९व्या आत्मार्पण दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र मिलिटरी स्कूलमध्ये वक्तृत्व स्पर्धा संपन्न)

आजच्या या अनौपचारिक चर्चेत स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांनी या गीताच्या आठवणीसह वीर सावरकरांच्या मराठी भाषेतील योगदानाविषयी माहिती दिली. या चर्चेत प्रख्यात निर्माता, लेखक, दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डेकर, कालनिर्णयचे संचालक जयेंद्र साळगावकर, जीवनगाणी संगीत परिवाराचे प्रसाद महाडकर, ‘स्वरगंध’चे मंदार गोगटे, मराठी भाषेतील बोलीभाषांवर काम करणारे श्रीनिवास, संगीतकार आणि गायक मंदार आपटे, मराठी कलाकार कुणाल रेगे आणि आस्वाद उपाहारगृहाचे सूर्यकांत सरजोशी हेही उपस्थित होते.

New Project 47 3

काय आहे ‘अनादी मी अनंत मी…’चा इतिहास ?

या चर्चेत सहभागी होतांना मंजिरी मराठे (Manjiri Marathe) म्हणाल्या, “सावरकर (Veer Savarkar) पॅरिसहून लंडनला रेल्वेने आल्यावर ब्रिटिश सरकारने अटक करून त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप करून खटला भरला. त्यांच्यावरचा खटला इंग्लंडमध्ये न चालवता हिंदुस्थानात चालवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सावरकरांना लंडनहून मोरिया बोटीने हिंदुस्थानात नेण्यात आले. ती बोट मार्सेलिसच्या बंदरात आल्यावर सावरकरांनी (Veer Savarkar) ८ जुलै १९१० या दिवशी ब्रिटिशांच्या ताब्यातून सुटका करून घेऊन आपल्या देशाला पारतंत्र्यातून मुक्त करण्याचा आपला लढा चालूच ठेवण्यासाठी त्यांनी समुद्रात उडी मारली. सावरकर ६० यार्ड एवढे अंतर पोहून गेले आणि त्यांनी मार्सेलिसचा किनारा गाठला. पण दुर्दैवाने ते पकडले गेले. त्यानंतर आपल्याला इंग्रजाकडून आपला अमानुष छळ होणार हे त्यांच्या लक्षात आलेच होते. त्यावेळी देशासाठी संघर्ष करण्याचे आत्मबळ पुन्हा वाढवण्यासाठी ज्या काव्य पंक्ती त्यांना स्फुरल्या त्या म्हणजे ‘अनादी मी … अनंत मी…’ हे गीत होय.”

New Project 48 3

या वेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठीला दिलेल्या स्वकीय शब्दांविषयी चर्चा झाली. या वेळी उपस्थित मान्यवरांनी मराठीतील इंग्रजी आणि अन्य भाषांतील परकीय शब्द टाळण्याचेही आवाहन केले. दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे आणि जयेंद्र साळगावकर यांनी कुसुमाग्रजांच्या (Kusumagraj) आठवणींना उजाळा दिला. अन्य मान्यवरांनी मराठी साहित्याविषयीच्या आपल्या आठवणी कथन केल्या. महाराष्ट्र गीताच्या गायनाने या अनौपचारिक सोहळ्याची सांगता झाली. (Marathi Bhasha Din)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.