Womens Day : चेंबूर तुर्भे शिक्षण संस्था आणि नाद संगीत विद्यालय यांच्या वतीने मंजिरी मराठे यांचा विशेष सत्कार

56

चेंबूर तुर्भे शिक्षण संस्था (Chembur trombay Educational Institute) आणि नाद संगीत विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आणि नारायण गजानन आचार्य आणि दामोदर कृष्णाजी मराठे महाविद्यालय, कलारंग आणि आचार्य ९० एफएम यांच्या सहकार्याने ‘महिला संमेलन २०२५’ (Women’s Conference 2025) १९ मार्च या दिवशी संध्याकाळी ५ ते ९ या वेळेत संपन्न झाले. या संमेलनात कला आणि साहित्य क्षेत्रात दिलेल्या विशेष योगदानासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या (Swatantryaveer Savarkar Rashtriya Smarak) कोषाध्यक्ष मंजिरी मराठे (Manjiri Marathe) यांचा सन्मान करण्यात आला. महिला दिनाच्या औचित्याने या संमेलनाचे प्रतिवर्षी आयोजन करण्यात येते. (Womens Day)

(हेही वाचा – Bombay High Court ने पोलिसांना फटकारले; म्हणाले, ‘सायबर गुन्ह्यांविषयीचा कारभार सुधारा’)

New Project 10 6

त्यांच्यासह न्यायाधीश डॉ. चंदा नाथांनी, न्याय आणि सामाजिक व्यवस्थापन क्षेत्रासाठी सुवर्णा खंडेलवाल-जोशी, संगीत क्षेत्रातील योगदानासाठी संगीता गोगटे आणि उद्योजक जान्हवी सप्रे यांचाही सन्मान करण्यात आला. तसेच निवृत्त प्राचार्य डॉ. विद्यागौरी लेले, नाद संगीत विद्यालयाच्या संस्थापिका शुभांगी जोशी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिजन्म शताब्दी जयंती समारोह समितीच्या सदस्य मीरा कवाडकर यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.

चेंबूर तुर्भे शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष रमेश म्हापणकर, सहसचिव हर्षवर्धन पांडे, सभासद शैलेश आचार्य, संदीप आचार्य, रेणुका आचार्य यांच्या हस्ते पुरस्कारर्थींचा सन्मान करण्यात आला.

असा झाला कार्यक्रम !

महिला संमेलनाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली. गायिका मधुरा शास्त्री यांच्या सुमधुर स्वागत गीताने कार्यक्रमाची उत्तम सुरुवात झाली. महिला संमेलनाचे निवेदन रंजना आंबेकर आणि सुवर्णा नलावडे यांनी केले. नारायण गजानन आचार्य आणि दामोदर कृष्णाजी मराठे महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ. सुनील कदम यांनी महाविद्यालयाची आणि तेथील शैक्षणिक अभ्यासक्रमाची सविस्तर माहिती दिली. संमेलनाचे प्रस्ताविक शुभांगी जोशी यांनी केले. शेरॉन जयवंत यांनी सादर केलेल्या नृत्य नाटिकेने संमेलनाची रंगत वाढली. कलारंगच्या सदस्या विनिता गर्गे, विशाखा कुलकर्णी, उषा हर्डीकर, मृदुला वाघमारे, स्वाती वैद्य, जयश्री भिसे, राधिका देसाई, आर्या आपटे, रंजना आंबेकर, पूनम राणे, आरजे कोमल यांनी पुरस्कारार्थींचा थोडक्यात परिचय करून दिला.

New Project 9 6

पुरस्काराला उत्तर देताना पुरस्कारर्थींनी मनोगत व्यक्त केले. पहिल्या पुरस्कारार्थी डॉ. चंदा नाथानी यांनी न्यायालयीन अनुभव सांगितला. स्त्रियांचे कायदे आणि कोर्टातील क्लिष्ट व्यवहार याबद्दल त्या भरभरून बोलल्या. स्त्रियांचे लैंगिक शोषण, बलात्कार यांविषयी समाजाने आवाज उठवला पाहिजे, पीडित स्त्रीने घाबरून न जाता एफआयआर वेळेवर दाखल करून आपले मेडिकलही लवकरात लवकर करावे, असे आवाहन नाथानी यांनी केले. सुवर्णा खंडेलवाल जोशी यांनी कायदा आणि सुव्यवस्था यांविषयी माहिती दिली. शासकीय कामांचा त्यांचा अनुभवही त्यांनी कथन केला.

हिंदूंच्या अस्तित्वासाठी ओम प्रमाणपत्र अत्यावश्यक – मंजिरी मराठे

मंजिरी मराठे यांनी ‘हिंदूंनी एकसंध होणे, ही काळाची गरज आहे’, या विषयावर प्रकाश टाकला. ‘हिंदूंच्या अस्तित्वासाठी आणि व्यवसाय वृद्धीसाठी ओम प्रमाणपत्र घेणे अत्यावश्यक आहे’, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला.

संगीता गोगटे या देवधर स्कूल ऑफ म्युझिकच्या माध्यमातून मुलांना घडवण्याचं कार्य करतात. आपल्या आयुष्यातील संगीताचे महत्त्व त्यांनी विशद केले. उद्योजिका जान्हवी सप्रे यांनी ‘आपल्या आईकडून मिळालेला वसा आपण पुढे चालवत आहोत’, असे सांगितले. घरगुती पदार्थ बनवण्याचा व्यवसाय आता एका फॅक्टरीत रूपांतरित झाला आहे आणि या पुरस्काराचे श्रेय त्या त्यांची आई, भाऊ, यजमान आणि फॅक्टरीतील सर्व कर्मचाऱ्यांना देतात.

या महिला सन्मान सोहळ्यात चेंबूर शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा आणि चेंबूर मधील सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. ऋतुजा फडके जोशी यांच्या सुश्राव्य अशा कीर्तनाने सर्वांची मने जिंकली. आरजे तेजस्विनी यांनी आभार प्रदर्शन केले. (Womens Day)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.