युरोपात बंद होणार पेट्रोल-डिझेलवर चालणा-या गाड्या, विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय

141

युरोपियन संसद आणि युरोपियन युनियनच्या सदस्य राष्ट्रांनी एक मोठा करार केला आहे. 2035 पर्यंत पेट्रोल आणि डिझेलवर चालणा-या नव्या गाड्यांच्या विक्रीवर बंदी घालण्याचा करार करण्यात आला आहे. जागतिक तापमान वाढीला कारणीभूत असणा-या वायूंचे उत्सर्जन कमी करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन ते साध्य करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. युरोपियन कमिशनने स्थापन केलेल्या फिट फॉर 55 पॅकेजचा या दशकातील हा पहिला करार आहे.

30 वर्षांत वाढले प्रदूषण

युरोपियन युनियनने आपल्या हवामान कायद्यात निर्धारित केलेली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी हा करार कटीबद्ध असल्याची माहिती युरोपियन संसदेने दिली आहे. युरोपियन युनियन(EU)ने दिलेल्या डेटानुसार, वाहतूक क्षेत्रामुळे गेल्या तीस वर्षांत प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. 1990 ते 2019 या काळात वाहतूक उत्सर्जन 33.5 टक्क्यांनी वाढलं आहे.

(हेही वाचाः ‘लग्नानंतर मुलीला घरातली कामं सांगणं म्हणजे…’, न्यायालयाची महत्वपूर्ण टिप्पणी)

शून्य कार्बन उत्सर्जनासाठी रणनीती

EU राष्ट्रांमध्ये एकूण कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनापैकी तब्बल 61 टक्के उत्सर्जन हे रस्ते वाहतुकीतून झाले आहे. यामध्ये प्रवासी गाड्यांचा वाटा मोठा आहे. 2025,2030 आणि 2035 मध्ये लक्ष्यांसह स्वच्छ शून्य कार्बन उत्सर्जन मार्गाची रणनीती यानिमित्तानं प्रथमच निश्चित केली गेली आहे. 2050 पर्यंत चांगल्या हवमानाच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यासाठी उचललेले हे मोठे पाऊल असल्याचे सांगण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.