International Internet Day : एका साध्या मेसेजमधून झाला होता इंटरनेटचा जन्म, काय होता मेसेज?

179

सध्या इंटरनेटमुळे जग जवळ आलं आहे, हे आपण गेल्या अनेक वर्षांपासून ऐकत आलो आहोत. आता तर 5जी मुळे देशातही एक वेगळी क्रांती झाली आहे. इंटरनेटमुळे माहिती मिळवणे, पत्ता शोधणे, दूरवरच्या व्यक्तींशी संपर्कात राहणे या आणि अशा कितीतरी गोष्टी साध्य करता येतात. त्यामुळे इंटरनेट हे काळाची गरज आहे.

पण इंटरनेटचा जन्म हा एका विद्यापीठातील विद्यार्थ्याने पाठवलेल्या एका शुल्लक मेसेजच्या माध्यमातून झाला होता, हे सांगूनही खरं वाटणार नाही. कॅलिफोर्निया विद्यापीठातील एका विद्यार्थ्याने 29 ऑक्टोबर 1969 ला पहिला इलेक्ट्रॉनिक मेसेज पाठवला. तेव्हापासून 29 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय इंटरनेट दिवस म्हणून साजरा केला जातो.

पहिला इलेक्ट्रॉनिक मेसेज

1929 मध्ये संपर्क साधणे हे गुगलवरुन एका क्लिकवर माहिती मिळवण्याइतके सोपे नव्हते. त्यावेळी इंटरनेटला ARPANET(Advanced Research Projects Agency Network) म्हणून ओळखले जात होते. कॅलिफोर्निया विद्यापीठ, लॉस एंजेलिस (UCLA) मधील विद्यार्थी प्रोग्रामर चार्ली क्लाइन याने 29 ऑक्टोबर 1969 रोजी पहिला इलेक्ट्रॉनिक मेसेज प्रसारित केला.

BOOK

प्राध्यापक लिओनार्ड क्लिनरॉक यांच्या देखरेखीखाली काम करणा-या क्लाईनने कॅलिफोर्निया विद्यापीठातील कॉम्प्युटरवरुन स्टॅनफोर्ड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या बिल डुव्हलला पहिला संदेश पाठवला होता. यावेळी कॅलिफोर्निया विद्यापीठातील होस्ट प्रणाली SDS Sigma 7 अशी होती, तर स्टॅनफोर्ड संस्थेतील प्रणाली ही SDS 940 अशी होती.

काय होता मेसेज?

Login असा संदेश या दोघांना एकमेकांना पाठवायचा होता. पण टर्मिनल्समधील कनेक्शन क्रॅश होण्यापूर्वी क्लाई आणि क्लेरॉक यांनी एकमेकांना फक्त L आणि O मेसेज पाठवला होता. सुमारे एक तासानंतर कनेक्शन सुरळीत झाल्यानंतर हा मेसेज यशस्वीरित्या पाठवण्यात आला. अशाप्रकारे, 29 ऑक्टोबर 1969 ला लांब अंतराच्या कॉम्प्युटर नेटवर्कवर ‘LO’ डेटा बीट पाठवण्यात आले. तेव्हाच सध्या जगभरात प्रसिद्ध असणा-या इंटरनेटचा जन्म झाला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.