पुण्यात एकाच दिवशी घडल्या तीन आगीच्या घटना

179

२८ आॅक्टोबर रोजी सायंकाळी सहानंतर आगीच्या ३ घटना घडल्या असून याठिकाणी अग्निशमन दलाचे जवान वेळेत पोहोचल्याने धोका टळला असून जखमी वा जीवितहानी कोठे घडली नाही. शुक्रवारी सायंकाळी दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांनी अग्निशमन मुख्यालयात त्यांच्या कार्यालयातून अप्सरा थिएटरच्या दिशेला मोठ्या प्रमाणात धूर दिसत असल्याचे नियंत्रण कक्षात कळवताच तातडीने दोन अग्निशमन वाहने रवाना करण्यात आली होती. त्यावेळी तिथे नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा पेटून प्रचंड धूर झाला होता. अग्निशमन प्रभारी अधिकारी प्रशांत गायकर व जवानांनी आग पूर्ण विझवली.

एसी डक्ट पॅनेलला आग 

तसेच सायंकाळी ०७.१२ वाजता हडपसर, चिंतामणी नगर, गल्ली क्रमांक ०४ येथे गादी कारखान्यात आग लागल्याची वर्दी मिळताच हडपसर व काळेबोराटे नगर अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले. घटनास्थळी सुमारे ६\७ कापसाच्या गाद्यांनी पेट घेतला होता. जवानांनी पाणी मारत आग विझवून पुढील धोका टाळला. अग्निशमन अधिकारी प्रमोद सोनावणे व जवानांनी कामगिरी पूर्ण केली. आगीचे कारण समजू शकले नाही. त्यानंतर लगेचच सायंकाळी ०७.१३ वाजता रविवार पेठ, तांबोळी मस्जिद जवळ, तारा मॉल येथे आग लागल्याची वर्दी मिळाली असता मुख्यालयातून एक फायरगाडी एक देवदूत वाहन, कसबा अग्निशमन वाहन व एक वाॅटर टँकर रवाना करण्यात आला होता. घटनास्थळी इमारत सात मजली असून टेरेसवर एसी डक्ट पॅनेलला आग लागून तिथेच असलेल्या रिकाम्या पाण्याच्या टाकीने पेट घेतला होता. जवानांनी पाणी मारत सुमारे दहा मिनिटात आग आटोक्यात आणत आग इतरञ पसरु न देता धोका टाळला असून यामधे कोणी जखमी नाही. आगीचे कारण समजू शकले नाही. तसेच अग्निशमन अधिकारी पंकज जगताप व प्रशांत गायकर व जवानांनी कामगिरी केली.

(हेही वाचा दहशतवादी संघटनांच्या आर्थिक स्त्रोतांना आळा घालण्याची गरज – परराष्ट्र मंत्री जयशंकर)

नियंत्रण कक्षात असंख्य फोन आले

रविवार पेठ येथील आग शहराच्या विविध भागातून दिसून आल्याने नियंत्रण कक्षात असंख्य फोन आले तसेच ‘आग किती मोठी आहे व कोणी जखमी/जिवितहानी झाली का’, अशी विचारणा अनेक नागरिकांनी केली. या ठिकाणी दलातील अँब्युलन्स अटेन्डट व तेथील रहिवाशी असलेले प्रविण सिद्धे यांनी विषेश मदत करत अग्निशमन वाहन पोहोचण्याआधी आणि नंतर योग्य ते मदतकार्य करुन आपले कर्तव्य बजावले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.