दिल्लीहून बेगंळुरुला जाणा-या इंडिगो विमानाचे इमर्जन्सी लॅंडिग करावे लागले. उड्डाण सुरु असतानाच विमानातून ठिणग्या निघत असल्याचे वैमानिकाच्या लक्षात आले. त्यामुळे तातडीने विमान थांबवावे लागले. इंडिगोने जारी केलेल्या निवेदनात याबाबत माहिती दिली आहे. सध्या सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. हे विमान पुन्हा कधी उड्डाण करु शकेल याबाबत अद्याप कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.
अपघात झालेल्या इंडिगोच्या विमानाचा क्रमांक 6E-2131 आहे. जारी केलेल्या निवेदनात, विमान कंपनीने म्हटले आहे की तांत्रिक बिघाडामुळे विमान थांबवावे लागले. सध्या विमान कंपनीकडून प्रवाशांसाठी दुस-या विमानाची व्यवस्था करण्यात येत आहे. इंडिगोने या घटनेबद्दल प्रवाशांची माफी मागितली आहे.
( हेही वाचा: कर्नाटकात २०० उर्दू शाळा नियमबाह्य पद्धतीने सुरु )
काही दिवसांआधीच घडली होती अशी घटना
काही दिवसांपूर्वी स्पाईसजेटच्या विमानातही असाच तांत्रिक बिघाड आढळून आला होता. स्पाईसजेटच्या विमानाने गोव्याहून हैदराबादला उड्डाण केले. हे विमान हैदराबादला पोहोचले होते आणि पायलट उतरण्याच्या तयारीत होते. मात्र त्यानंतर अचानक संपूर्ण विमान धुराने भरले. यामुळे पायलटला तातडीने इमर्जन्सी लॅंडिंग करावे लागले. इमर्जन्सी लॅंडिगच्या वेळी विमान कंपनीने त्यांना ऑक्सिजन मास्कही दिला नसल्याचा आरोप प्रवाशांनी केला होता.
Join Our WhatsApp Community