मविआच्या 15 नेत्यांची सुरक्षा काढली,नार्वेकरांच्या सुरक्षेत मात्र वाढ; शिंदे सरकारचा निर्णय

137

महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांची सुरक्षा राज्यातील शिंदे -फडणवीस सरकारने काढली आहे. मिलिंद नार्वेकर यांची सुरक्षा मात्र वाढवण्यात आली आहे. त्याशिवाय जितेंद्र आव्हाड यांची सुरक्षाही जैसे थे ठेवण्यात आली आहे. मविआच्या नेत्यांची सुरक्षा काढत शिंदे सरकारने विरोधकांना मोठा धक्का दिला आहे. मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत झालेली वाढ हा चर्चेचा विषय ठरला आहे. नार्वेकर यांना आधी एक्स कॅटेगरीची सुरक्षा होती. आता त्यांना वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे.

( हेही वाचा: इंडिगो विमानाच्या इंजिनला आग; टेक ऑफ दरम्यान इंजिनमधून निघाला स्पार्क )

या नेत्यांची सुरक्षा काढली?

  • वरुण सरदेसाई
  • छगन भुजबळ
  • बाळासाहेब थोरात
  • नितीन राऊत
  • नाना पटोले
  • जयंत पाटील
  • सतेज पाटील
  • संजय राऊत
  • विजय वडेट्टीवार
  • धनंजय मुंडे
  • भास्कर जाधव
  • नवाब मलिक
  • नरहरी झिरवळ
  • सुनिल केदारे
  • डेलकर परिवार

शिंदे सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मागच्या दोन- तीन महिन्यात शिंदे सरकारकडून महाविकास आघाडी सरकारच्या अनेक निर्णयांना स्थगिती देण्यात आली होती. यावरुन राजकीय वातावरण तापले असताना, मविआच्या नेत्यांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.