पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी पोलिसांसाठी ‘एक राष्ट्र, एक गणवेश’ची कल्पना मांडली. ही केवळ विचारासाठी सूचना आहे, कोणत्याही राज्यांवर लादण्याचा प्रयत्न नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. व्हिडीओ काॅन्फरन्सिंगद्वारे राज्यांच्या गृहमंत्र्यांच्या चिंतन शिबिराला संबोधित करताना, मोदींनी तरुणांना दहशतवादाकडे ओढणा-या आणि भावी पिढ्यांचे मन विकृत करणा-या शक्तींना यावेळी इशारा दिला.
( हेही वाचा: Facebook,Twitter ची आता सरकारकडे करा तक्रार; काय आहे सरकारचा निर्णय? )
अशा शक्तींना आंतरराष्ट्रीय पातळीवर मदत मिळते
नक्षलवादाचा प्रत्येक प्रकार, मग तो बंदुकीद्वारे असो किंवा लेखणीद्वारे असो, तो उखडून टाकला पाहिजे. देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी सरदार पटेल यांच्या प्रेरणेने अशा कोणत्याही शक्तींना देशात वाढू देऊ शकत नाही, असा इशारा पंतपआधान नरेंद्र मोदी यांनी दिला. अशा शक्तींना आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्षणीय मदत मिळते, असा दावाही त्यांनी केला आहे.
Join Our WhatsApp Community