जेव्हा वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ झिम्बाब्वेकडून हरला होता …

153

ऑस्ट्रेलियात T-20 वर्ल्डकप स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत झिम्बाब्वेने पाकिस्तानाला हरवले. तेव्हापासून पाकिस्तान आणि झिम्बाब्वे हे दोन्ही संघ चर्चेचा विषय ठरले आहेत. पाकिस्तान भारतीय संघाकडून हरल्यानंतर झिम्बाब्वेनेदेखील पाकिस्तानला नमवल्याने पाकिस्तानची उपांत्य फेरीत जाण्याची आशा मावळली आहे.

पाकिस्तानची सेमी फायनलची वाट झिम्बाब्वेने खडतर केल्यामुळे भारतीय चाहते अतिशय खूश आहेत. मात्र झिम्बाब्वेने वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघलाही हरवले होते, हे विसरुन चालणार नाही.

New Project 2022 10 29T170725.601

( हेही वाचा: T20 World Cup : सामन्यापूर्वी भारतीय फलंदाजांना दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजाने केले चॅलेंज, म्हणाला…)

अन् तेव्हा भारत हरला होता…

लिस्टरच्या मैदानात झालेल्या 1999 च्या वनडे वर्ल्डकपमधील सामन्यात झिम्बाब्वेने भारताला हरवले होते. वडिलांच्या निधनामुळे सचिन तेंडुलकर मायदेशी परतला होता. झिम्बाब्वेने 252 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करत असताना, सौरव गांगुलीचा विकेट स्वस्तात गेला, त्याने 9 धावा केल्या. राहुल द्रविडही 13 रन्स करुन तंबूत परतला. कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनला हिथ स्ट्रीकने आउट केले. त्याने 7 धावा केल्या. भारत 56/3 अशा परिस्थितीत असताना सदागोपन रमेश आणि अजय जडेजा या जोडीने डाव सावरला. रमेशने अर्धशतक मारले. मात्र त्यानंतर रमेश लगेच आऊट झाला आणि ही जोडी फुटली. रमेशने त्यावेळी 55 धावांची महत्त्वपू्र्ण खेळी केली. त्यानंतर अजय जडेजालादेखील 43 धावांवर हिथ स्ट्रीकने माघारी धाडले. दडपण असल्याने धावा घेण्याच्या गडबडीत अजित आगरकर रनआऊट झाला.

New Project 2022 10 29T170704.028

अजित नंतर आलेल्या राॅबिन सिंगला नयन मोंगियाची साथ मिळाली. ही जोडी चांगला खेळ करणार असं वाटत असतानाच गाय व्हिटालने मोंगियाला आऊट केले. त्याने 28 धावांची खेळी केली. त्यानंतर आलेल्या जवागल श्रीनाथने राॅबिन सिंगला चांगली साथ दिली त्यामुळे भारताच्या विजयाचे चित्र दिसत होते. मात्र, फास्ट बाॅलर हेन्री ओलोंगाने राॅबिन सिंगला आऊट केले आणि भारताच्या विजयाच्या आशा मावळल्या. राॅबिन सिंगने 35 धावांची खेळी केली. जवागल श्रीनाथ आणि पाठोपाठ वेंकटेश प्रसादला तंबूत परतवत झिम्बाब्वेने सामना आपल्या खिशात टाकला आणि खळबळजनक विजयाची नोंद केली.

आता सुरु असलेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तान आणि नेदरलॅंडविरुद्ध चांगली सुरुवात केली आहे. प्राथमिक लढतीत भारताची शेवटची लढत झिम्बाब्वेविरुद्धच होणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.