भारतीय नौसेनेत थेट भरती, 10वी पास विद्यार्थीही करू शकतात अर्ज! वाचा पात्रता

145

भारतीय नौसेनेत 180 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यासाठीची अधिसूचना आता जारी करण्यात आली आहे. यातील काही पदांसाठी 10वी पास किंवा आयटीआयचे शिक्षण घेणे आवश्यक आहे. त्यामुळे नोकरीच्या शोधात असणा-यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे.

180 जागांसाठी भरती

विविध विभागांमध्ये शिकाऊ उमेदवार या पदांसाठी ही भरती प्रक्रिया असणार आहे. ITI Apprentice in Naval ship repair yard,naval base या पदासाठी ही भरती असणार आहे. एकूण 180 जागांवर ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. संबंधित पदानुसार इच्छुक उमेदवारांकडे 10 वी पास किंवा आयटीआय पर्यंतचे शिक्षण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांना संबंधित पदाचा पुरेसा अनुभव असणे देखील आवश्यक आहे. पात्र उमेदवारांना नौसेनेच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

(हेही वाचाः ठाण्यात आरोग्य विभागात भरती! 10,12वी,पदवीधरही करू शकतात अर्ज)

तसेच काही पदांसाठी पदवीपर्यंतचे शिक्षण ही शैक्षणिक पात्रता पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण पूर्ण करणे आवश्यक असणार आहे. याबाबतची अधिक माहिती नौसेनेच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

या पदांसाठी भरती प्रक्रिया

सुतार,इलेक्ट्रिशियन,इलेक्ट्रॉनिक्स,मेकॅनिक,फिटर,इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मशिनिस्ट मेकॅनिक,डिझेल मेकॅनिक,मोटार वाहन मेकॅनिक यांसारख्या 180 जागांसाठी भरती होणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.