प्रवाशांना तिकीट खरेदीसाठी रांगेत उभे राहावे लागू नये, यासाठी महामेट्रोने गेल्या आठवड्यात पुण्यातील मेट्रो स्थानकांमध्ये १२ डिजिटल किऑस्क बसविले आहेत. या अंतर्त गुगल- पे चा वापर करूनही तिकिट खरेदी करता येईल.
तिकिटांसाठी आता डिजिटल किऑस्क यंत्रणा
महामेट्रोने पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमधील मेट्रो स्थानकांवर तिकीट खरेदीसाठी विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. डिजिटल किऑस्क हे स्वयंचलित यंत्र आहे. या यंत्रावरील क्यू-आर कोड करून प्रवासी तिकिट घेऊ शकतात. प्रवाशांनी त्यांच्या प्रवासाचे तपशील नमूद केल्यावर त्यांची पेमेंट प्रक्रिया पूर्ण झाल्यावर प्रवासाचे तिकिट उपलब्ध होईल.
तसेच मेट्रो प्रवासी बँकेच्या डेबिट कार्डने सुद्धा पेमेंट करून तिकीट खरेदी करू शकतील. डिजिटल किऑस्कमध्ये तिकीट घेण्यासाठी मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये सूचना देण्यात येतील, तुम्ही सोयीस्कर भाषा निवडू शकता. हे मशिनमध्ये तिकीट काढण्यासाठी टच स्क्रिन सुविधा आहे.
एटीएम मशिनप्रमाणे प्रवासी अगदी सहज डिजिटल किऑस्क हाताळू शकतात. पुणे मेट्रोच्या अॅपवरूनही प्रवाशांना मेट्रो प्रवासाचे तिकीट आता सहज उपलब्ध होणार आहे.
Join Our WhatsApp Community