माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेर महाराष्ट्र दौरा केलाच. खरंतर ठाकरे औरंगाबादमध्ये दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करायला गेले होते. अनेक लोक या पाहणीला महाराष्ट्र दौरा म्हणत आहेत. मुळात उद्धव ठाकरेंच्या कॅमेरातून जेवढा भाग दिसतो, त्या भागाला महाराष्ट्र म्हटलं जातं. मग ठाकरेंच्या पॅनेलचे इतर या गोष्टींची स्तुती करतात.
( हेही वाचा : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या प्रचार कमिटीमध्ये होता १९ वर्षीय भारतीय मुलगा; हा प्रज्वल पांडे आहे तरी कोण?)
उद्धव ठाकरेंचा हा १५ मिनिटांचा दौरा खरंतर सर्व वर्तमानपत्रांच्या टीकेस पात्र आहे. तरी अतिशय हुशारीने या चाय बिस्कुट पत्रकारांनी या मुद्द्याकडे दुर्लक्ष केलं. पण वाचकांनो, आता सोशल मीडिया इतका मोठा झाला आहे की, कुणी पत्रकारांना कितीही पाकिटं दिली तरी गोष्टी लपून राहत नाहीत. ही बातमी एक वृत्तवाहिनी कशी देते पाहुयात, “पाऊस आला आणि बळीराजाच्या शिवाराची नासाडी करुन गेला. आता सुरु झालाय घोषणांचा पाऊस. सरकारने मदतीची घोषणा करताच विरोधकही शेताच्या बांधावर पोहोचले. उद्धव ठाकरेंनी आज औरंगाबादचा दौरा केला. यावेळी शेतकऱ्यांना धीर देताना त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. तर सत्ताधाऱ्यांनीही ठाकरेंच्या दौऱ्यावर तोंडसुख घेतलं. एकूणच काय तर शेताच्या बांधावरुन आता राजकारण पेटलंय. पाहूया सत्ता गेल्यानंतरचा ठाकरेंचा हा पहिला दौरा. त्यानंतर आता सत्ताधाऱ्यांकडून मात्र टीका सुरु झाल्या आहेत.”
बातमी अशाप्रकारे दिली आहे जणू उद्धव ठाकरे १५ दिवसांच्या दौर्यावर गेले होते. मुळात पंधरा मिनिटांचा हा दौरा म्हणजे शेतकर्यांचा अपमान होता. ही वृत्तवाहिनी म्हणते की, त्यांनी शेतकर्यांना धीर दिला. १५ मिनिटांत पाहणी कधी केली आणि धीर कधी दिला. खरंतर त्यांनी स्वतःलाच धीर दिलाय. कारण ते घरी बसून राहण्यासाठी प्रख्यात आहेत. लोक म्हणतात की ते बाहेर पडतच नाहीत. म्हणून ते १५ मिनिटांचा दौरा करुन आले आणि स्वतःला धीर देत म्हणाले की आपणही बाहेर पडतो की… विरोधक उगीच आरोप करत असतात असं त्यांनी स्वतःच्याच मनाला समजावलं. त्यास ही वृत्तवाहिनी शेतकर्यांना धीर दिला असं म्हणते.
या दौर्यावर बाळासाहेबांच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी शब्दांत टीका केलीय. ते म्हणाले, “सर्वसामान्य शेतकऱ्याच्या किंवा कार्यकर्त्याच्या घरी चहा प्यायला गेलं तरी २० मिनिटं लागतात. पण १५ मिनिटांत दुष्काळ पाहणी दौरा होतं असेल तर यासारखं आश्चर्य नाही” खरंच हे जगातलं एकमेव आश्चर्य आहे आणि हे फक्त आणि फक्त उद्धव ठाकरेच करु शकतात. लहान मुले भोवरा फिरवतात. तो काही वेळ फिरतो आणि लगेच थांबतो. हा दौरा कधी सुरु झाला आणि कधी संपला हेच कळलं नाही म्हणून या दौर्यास भोवरा म्हणणे जास्त श्रेयस्कर ठरेल.
Join Our WhatsApp Community