बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणौत ही राजकीय मुद्द्यांसह कोणत्याही विषयावर आपले मत स्पष्टपणे माडंण्यासाठी ओळखली जाते. तर कंगनाने प्रत्येक वेळी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केल्याचेही पाहायला मिळत आहे. राजकीय विषयांपासून ते सामाजिक आणि देशाच्या समस्यांवर ती उघडपणे आपली मते मांडते. बॉलिवूडच्या या अभिनेत्रीने आता राजकारणात येण्याची घोषणा केली आहे. हिमाचल प्रदेश पंचायत निवडणुकीदरम्यान कंगना रणौतने आपल्या गावी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याने लवकरच कंगनाची राजकारणात एन्ट्री होणार का याकडे साऱ्याचे लक्ष लागले आहे.
(हेही वाचा – मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदें गटात जाणार? राजकारणात पुन्हा ट्विस्ट)
भाजपच्या जागेवर निवडणूक लढवण्याची इच्छा
नुकतेच एका कार्यक्रमात कंगना राणौतने आपल्या राजकीय कारकिर्दीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. येत्या आगामी काळात हिमाचल प्रदेशात पंचायत निवडणुका होणार असून कंगनाला निवडणूक लढवून जनतेची सेवा करायची आहे. राज्यात निवडणुका होणार आहेत आणि त्याच दरम्यान कंगना राणौत हिने हिमाचल प्रदेशमधून निवडणूक लढवण्याची घोषणा केली. कंगनाने असे सांगितले की, जनतेची इच्छा असेल आणि भारतीय जनता पक्ष मला तिकीट देईल तर ती निवडणूक लढवण्यास मी तयार आहे.
कुटुंब भाजप समर्थक
कंगनाने असेही सांगितले की, मी राजकीय कुटुंबातून आले आहे. माझे वडीलही राजकारणात होते. माझ्या वडिलांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अनेक कामे केली. पण 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार स्थापन झाल्यावर परिस्थिती सुधारली. माझ्या वडिलांनी मला पहिल्यांदा पंतप्रधानांबद्दल माहिती दिली आणि 2014 मध्ये आमचे कुटुंब अधिकृत काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपमध्ये आले.
Join Our WhatsApp Community