नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासंदर्भात केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी महत्त्वाची माहिती दिली. नागपूर ते पुणे प्रवास आता केवळ ८ तासात शक्य होणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. तर समृद्ध महामार्गाला एक्स्प्रेस ग्रीन एक्स्प्रेस वेनी जोडण्यात येणार असल्याचेही त्यांनी ट्विट करून सांगितले.
काय केली गडकरींनी घोषणा
सद्यस्थितीत नागपूर ते पुणे हा प्रवास करताना प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे नागपूर-मुंबई समृद्ध महामार्गाला औरंगाबाद जवळ नवीन प्रस्तावित पुणे-औरंगाबाद एक्सेस कंट्रोल ग्रीन एक्सप्रेस-वे नी जोडण्यात येणार असल्याचे नितीन गडकरींनी सांगितले.
औरंगाबाद अहमदनगर पुणे महामार्गावरील वाहनांची रहदारी वाढली असून औरंगाबाद पुणे शहरांना जोडणारा स्वतंत्र एक्स्प्रेस वे उभारण्यात येणार आहे. औरंगाबाद-पुणे एक्स्प्रेस वे हा २८६ किमी लांबीचा असणार आहे. पुणे, अहमदनगर, बीड आणि औरंगाबाद अशा चार जिल्ह्यातून हा जलदगती महामार्ग जाणार आहे.
(हेही वाचा – Safran Project: नागपुरात होणारा आणखी एक प्रकल्प गेला महाराष्ट्राबाहेर)
नागपूर ते पुणे प्रवास आठ तासात होणार शक्य!
सद्यस्थितीत नागपूर ते पुणे हा प्रवास करताना प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेता नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला छत्रपती संभाजीनगरजवळ नवीन प्रस्तावित पुणे – संभाजीनगर (औरंगाबाद) एक्सेस कंट्रोल ग्रीन एक्सप्रेस-वे नी जोडण्यात येईल. pic.twitter.com/dX9EtRnmEj
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) October 30, 2022
सहा पदरी महामार्ग असणार
राष्ट्रीय महामार्गाकडून या मार्गाचे काम करण्यात येईल. यामुळे यामुळे पुणे – छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) प्रवास अडीच तासांत आणि समृद्धी महामार्गाद्वारे नागपूर – छत्रपती संभाजीनगर प्रवास साडेपाच तासांत करता येणे शक्य होणार आहे. औरंगाबाद-पुणे एक्सप्रेस वे हा महामार्ग पुण्यातील पुणे-बंगळुरू महामार्ग म्हणजे प्रस्तावित रिंग रोड येथून सुरू होईल. तर, औरंगाबाद येथे समृद्धी महामार्गाजवळ याचा शेवट असणार आहे. हा महामार्ग सहा पदरी असणार आहे.
Join Our WhatsApp Community