गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात होणारे मोठे प्रकल्प इतर राज्यात गेल्याचे समोर आले आहे. दरम्यान, सर्वात पहिले वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला होता. त्यानंतर टाटा एअरबसचा C-295 लष्करी ट्रान्सफोर्ट एअरक्राफ्ट प्रकल्प नागपूरमध्ये होणारा प्रकल्प देखील गुजरातमधील वडोदऱ्याला गेला. त्यानंतर आता नागपूरात होणार आणखी एक प्रकल्प हैदराबादला गेला आहे. महाराष्ट्रातून चार ते पाच मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपाचं सत्र सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.
(हेही वाचा – वर्षानुवर्षे चलनी नोटांवर दिसणारा गांधींचा ‘हा’ फोटो नेमका आला तरी कुठून?)
अशातच विरोधकांनी शिंदे सरकारवर निशाणा साधल्यानंतर आता शिंदे-फडणवीस सरकारने त्यांच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या प्रकल्पांची यादी जाहीर केली आहे. गेल्या ४ महिन्यांपूर्वी राज्यात शिंदे सरकारची सत्ता स्थापन झाली. शिंदे सरकारने दावा करत गेल्या ४ महिन्यात कोणते हे प्रकल्प आहेत आणि कोणत्या ठिकाणी ते होणार आहेत त्याची यादी खालील प्रमाणे-
1. सिनारामस् पल्प अॅण्ड पेपर प्रकल्प – रायगड
गुंतवणूक – २० हजार कोटी रूपये
2. सोलार इंड्रस्ट्रिज इंडिया प्रकल्प – नागपूर
गुंतवणूक – ३७८ कोटी रूपये
3. महाराष्ट्र सिमलेस लिमिटेड प्रकल्प – रायगड
गुंतवणूक – ३७५ कोटी रूपये
4. सनफ्रेश अॅग्रो इंडस्ट्रीज प्रकल्प – अहमदनगर
गुंतवणूक – ६६२ कोटी रूपये
5. वरूण बेवरजेस लिमिटेड प्रकल्प – अहमदनगर
गुंतवणूक – ७७९ कोटी रूपये
6. विठ्ठल कॉर्पोरेशन प्रा. लिमिटेड प्रकल्प – सोलापूर
गुंतवणूक – १२६ कोटी रूपये
7. आयएफबी रेफ्रिजरेटर्स लिमिटेड प्रकल्प – पुणे
गुंतवणूक – ४०० कोटी रूपये
8. जेनक्रेस्ट बायो प्रोडक्ट्स प्रकल्प – जळगाव
गुंतवणूक – ६५० कोटी रूपये
9. मेगा पाईप्स प्रायव्हेट लिमिटेड प्रकल्प – रायगड
गुंतवणूक – ७५८ कोटी रूपये