ऑक्टोबर हीटपासून महिनाभर दिलासा मिळालेल्या मुंबईकरांना रविवारी, 30 ऑक्टोबर रोजी तापमान वाढीचा अनुभव आला. रविवारी मुंबईचे कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसवर नोंदवले गेले. मुंबईत ऑक्टोबर महिन्यात ३४ अंश सेल्सिअसपर्यंत कमाल तापमान अपेक्षित असते. मात्र ऑक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस बराच काळ मुंबईत रेंगाळल्याने कमाल तापमानात फारशी वाढ झाली नव्हती. येत्या दिवसांत कमाल आणि किमान तापमानात घट दिसून येईल. मंगळवारी किमान तापमान १९ अंश सेल्सिअसवर खाली घसरेल, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला.
किमान तापमानही बरेचदा २० अंशावरच स्थिरावले
मान्सून माघारी परतल्यानंतर आठवड्याभरानंतर कमाल तापमानात फारशी वाढ दिसून आली नव्हती. कमाल तापमान क्वचित वेळा वाढल्याचे दिसून आले. किमान तापमानही बरेचदा २० अंशावरच स्थिरावलेले दिसून आल्याने सकाळच्या प्रहारात मुंबईत बरेचदा गारवा जाणवत होता. दोन दिवसांपासून कमाल तापमानात वाढ सुरु होती. अखेरीस रविवारी कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसवर पोहोचले. सोमवारी कमाल तापमान ३५ आणि किमान तापमान २० अंश सेल्सिअसवर नोंदवले जाईल, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याकडून वर्तवला गेला.
(हेही वाचा IND vs SA T20 World Cup : समोरासमोर न भिडता भारताने पाकिस्तानला केले विश्वचषकातून ‘आऊट’)
Join Our WhatsApp Community