फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची मागणी अनेक दिवसांपासून सरकारी कर्मचारी करत आहेत. सरकार फिटमेंट फॅक्टर वाढवण्याचा विचार करत असल्याच्या अनेक बातम्या येत आहेत. सरकारने अलीकडेच कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली आहे. आता कर्मचा-यांना 38 टक्के दराने डीए मिळतो. दरम्यान, आता सरकार फिटमेंट फॅक्टर अंतर्गत किमान मूळ वेतन 18 हजार रुपये आहे, ते 26 हजार रुपये करण्याची मागणी केली जात आहे. यंदा फिटमेंट फॅक्टरबाबत कोणताही निर्णय घेणे अवघड असले तरी पुढील वर्षीच्या अर्थसंकल्पात याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
( हेही वाचा : 7th Pay Commission : नववर्षात केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार खुशखबर! महागाई भत्ता ४२ टक्के होणार ? )
…तर मूळ पगार 26 हजार होईल
सरकारने जर फिटमेंट फॅक्टर 3.68 टक्क्यांपर्यंत वाढवले तर कर्मचा-यांचे मूळ वेतन 26 हजार रुपये होईल. सध्या किमान मूळ वेतन 18 हजार रुपये आहे . तथापि, सरकार किमान मूळ वेतन 21 हजार रुपये करण्याचा विचार करत आहेत. केंद्रीय मंत्रिमडंळाने जून 2017 मध्ये 34 सुधारणांसह सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी मंजूर केल्या होत्या. एन्ट्री लेव्हल बेसिक वेतन दरमहा, 7 हजार रुपयांवरुन 18 हजार रुपये करण्यात आले आहे. तर सर्वोच्च स्तर म्हणजेच सचिवांचे वेतन 90 हजार रुपयांवरुन 2.5 लाख रुपये करण्यात आले. सरकारने यापूर्वी 2017 मध्ये एंट्री लेव्हल मूळ पगार 7 हजार प्रति महिन्यावरुन 18 हजार रुपये केले होते.
Join Our WhatsApp Community