SRA प्रकरणात किशोरी पेडणेकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार ?

153

उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर या लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप आणि दादर पोलिसांच्या चौकशीसत्रासंदर्भात पेडणेकर या मुख्यमंत्र्यांना भेटण्याची शक्यता आहे. वरळीच्या गोमात नगर एसआरए प्रकल्पात पेडणेकर यांनी घोटाळा केल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे.

….म्हणून घेऊ शकतात मुख्यमंत्र्यांची भेट

राज्यात सुरु असलेले राजकारण हे बदल्याचं राजकारण आहे. तसेच, आपल्याला बदनाम करण्याचे षड्यंत्र रचलं जात असल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. वरळी येथील गोमाता नगर परिसरात ज्या एसआरए इमारती आहेत याठिकाणी गाळे आणि फ्लॅट्सचा घोटाळ्यात पेडणेकरांचा सहभाद असल्याचा आरोप किरिट सोमय्यांनी केला आहे. त्यामुळे अशा प्रकारे एखाद्यावर थेट आरोप केले जात असतील वा बदनाम केले जात असेल तर मात्र त्या विरोधात आवाज उचलण्याची भूमिका पेडणेकर यांनी घेतली आहे. त्यामुळे याच संदर्भात बातचीत करण्यासाठी कदाचित पेडणेकर या मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

( हेही वाचा: शिंदे-फडणवीस यांच्या भेटीनंतर राणांकडून दिलगिरी व्यक्त; ‘त्या’ वादावर रवी राणा नेमके काय म्हणाले?

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.