सर्वोच्च न्यायालयाने बलात्कार तसेच लैंगिक शोषणाच्या प्रकरणांमध्ये करण्यात येणा-या कौमार्य चाचणीवर ( टू फिंगर टेस्ट) बंदी घातली आहे. तसेच अशा प्रकारची चाचणी करणा-यांना गैरवर्तनाच्या आरोपाखाली दोषी ठरवले जाईल, असे स्पष्ट केले आहे.
आजही आपल्याकडे कौमार्य चाचणी घेतली जाते हे निंदनीय आहे, अशी खंतही न्यायालयाने व्यक्त केली. न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड आणि हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. बलात्कार प्रकरणी शिक्षा सुनावताना त्यांनी ही टिप्पणी केली आहे.
( हेही वाचा: २ वर्षांत महाराष्ट्राला गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर आणणार! – देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास )
…म्हणून ही चाचणी घेतली जाऊ नये
न्यायालयाने वारंवार बलात्कार आणि लैंगिक शोषण प्रकरणात कौमार्य चाचणी करण्यास नकार दिला आहे. या चाचणीला कोणताही आधार नाही. याऊलट पीडित महिलेवर पुन्हा अत्याचार करण्यासारखे असून, तिला अजून एक मानसिक धक्का देण्यासारखे आहे. ही चाचणी घेतली जाऊ नये. लैंगिकदृष्ट्या सक्रीय स्त्रियांवर बलात्कार केला जाऊ शकत नाही. या चुकीच्या आधारावर ही चाचणी केली जात आहे. पण सत्यापेक्षा मोठे काही नाही, असे निरिक्षण खंडपीठाने नोंदवले आहे.
Join Our WhatsApp Community