शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चांगलीच तेजी दिसून आली. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (सेन्सेक्स) 786 अंकांनी वधारला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) 225 अंकांनी वधारला. सेन्सेक्समध्ये आज, सोमवारी 1.31 टक्क्यांची वाढ होऊन तो 60,746 वर पोहोचला. तर निफ्टीमध्ये 1.27 टक्क्यांची वाढ होऊन तो 18,012 अंकांवर पोहोचला. निफ्टी बँकमध्येही आज 317 अंकांची वाढ होऊन तो 41,307 अंकांवर स्थिरावला.
(हेही वाचा – पोलिस कर्मचाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्र्यांची ‘स्पेशल ऑपरेशन मेडल’ घोषित, महाराष्ट्रातील ‘या’ 11 अधिकाऱ्यांचा समावेश)
शेअर बाजारात आज, सोमवारी एकूण 1788 शेअर्समध्ये वाढ झाली. तर 1657 शेअर्समध्ये घसरण झाली. एकूण 164 शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. बाजारात अल्ट्राटेक सिमेंट, आयशर मोटर्स, एमऍण्डएम, एचडीएफसी आणि सन फार्मा यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली. तर अपोलो हॉस्पीटल्स, डॉ. रेड्डीड लॅब, एनटीपीसी, इंडसंड बँक आणि ब्रिटानिया इंडस्ट्रीज यांच्या निफ्टीमध्ये घसरण झाली. शेअर बाजारात आज जवळपास सर्वच क्षेत्रातल्या शेअर्समध्ये वाढ झाल्याचं दिसून आलं. बीएसई मिडकॅप इंडेक्समध्ये एका टक्क्याची तर स्मॉलकॅप इंडेक्समध्ये 0.5 टक्क्याची वाढ नोंद झाली आहे.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आज 287.11 अंकांच्या तेजीसह 60,246.96 अंकांवर खुला झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 123.40 अंकांच्या तेजीसह 17,910.20 अंकावर खुला झाला. सकाळी 10.10 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 577 अंकांच्या तेजीसह 60,537.15 अंकावर व्यवहार करत होता. तर, निफ्टी निर्देशांक 157 अंकांच्या तेजीसह 17,944.75 अंकांवर व्यवहार करत होता.
Join Our WhatsApp Community