Google ने प्ले स्टोअरवरुन हटवली ही 13 Apps, तुमच्या फोनमध्येही असतील तर डिलीट करा

170

Google Play Store मधून आपण आपले अँन्ड्रॉईड फोनमधील अॅप्स डाऊनलोड करतो. पण प्ले स्टोअर वर अशीही काही अॅप्स आहेत जी ग्राहकांच्या मोबाईल फोनसाठी घातक आहेत. अशीच 13 अॅप्स गुगलकडून प्ले स्टोअरवरुन हटवण्यात आली आहेत. या अॅप्समुळे फोनची बॅटरी लवकर संपणं आणि सुरक्षेच्या दृष्टीने काही कमतरता या अॅप्समध्ये असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळेच ही अॅप्स हटवण्यात आली आहेत.

गुगलने हटवले अॅप्स

McAfee Mobile Research Teamच्या रिसर्च टीमने या अॅप्सच्या बाबत आपला रिपोर्ट संबंध केला होता. त्यामध्ये या अॅप्स संदर्भात रिपोर्ट देखील करण्यात आले होते. याची गंभीर दखल घेत गुगलने या अॅप्सना प्ले स्टोअर वरुन हटवले आहे. ग्राहकांच्या मोबाईलवर ही अॅप्स बॅकग्राऊंडमध्ये रन होत असून त्यामुळे बॅटरी लो होणं आणि ग्राहकांची खाजगी माहिती चोरणं असे प्रकार घडत होते. यामुळे फसवणूक टाळण्यासाठी गुगलने ही कारवाई केली आहे.

(हेही वाचाः MPSC कडून लवकरच येणार डिजिटल मूल्यांकन पद्धत, असा लागणार स्पर्धा-परीक्षांचा निकाल)

या अॅप्सवर कारवाई

High Speed Camera,SmartTask,Flashlight+,Memo Calendar,English-Korean Dictionary,BusanBus,Quick Notes,Smart Currency Converter,Joycode,EzDica,Instagram Profile Downloader,Ez Notes,Image Vault Hide Images या अॅप्सवर गुगलकडून कारवाई करण्यात आली आहेत. तसेच आपल्या मोबाईलमध्ये ही अॅप्स असतील तर ती डिलीट करण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.