माथेरान टॉय ट्रेनची पुन्हा जोरदार एन्ट्री! केवळ ९ दिवसांत ४.८१ लाखाचं उत्पन्न

विस्टाडोम कोच नेरळ- माथेरान विभागातही प्रचंड लोकप्रिय आहे

169

मुंबई, पुणे आणि परिसरातील नागरिकांसाठी माथेरान हे सर्वात जवळचे आणि सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. नेरळ-माथेरान टॉय ट्रेन जी 100 वर्षांहून अधिक जुनी आहे, ती भारतातील काही पर्वतीय रेल्वेंपैकी एक आहे. 2019 मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नेरळ- माथेरान ट्रॅक वाहून गेला होता. तेव्हापासून मध्य रेल्वे युद्धपातळीवर रेल्वेची पुनर्बांधणी आणि पुनर्स्थापना करीत आहे. नेरळ ते अमन लॉज पर्यंत पर्वतांना वळण देणारी नॅरोगेज लाईन अखेर तयार झाली आणि 22 ऑक्टोबर रोजी या मार्गावरील सेवा पुन्हा सुरू झाली. टॉय ट्रेनच्या सेवेचे प्रवाशांनी अत्यंत आनंदात स्वागत केले असून त्याला उदंड प्रतिसाद दिला आहे.

(हेही वाचा – DAE Recruitment: अवघ्या १८व्या वर्षी मिळवा ‘या’ विभागात केंद्र सरकारच्या नोकरीची संधी)

22 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर या कालावधीत, व्हिस्टाडोममध्ये 229, प्रथम श्रेणीतील 378 आणि द्वितीय श्रेणीतील 3,091 अशा एकूण 3,698 व्यक्तींनी प्रवास करून रु.4,84,141/- च्या महसूलाची नोंद केली आहे. यामध्ये व्हिस्टा डोम तिकिटांच्या विक्रीतून रु. 1,49,995/- इतका महसूल समाविष्ट आहे जो एकूण रकमेच्या जवळपास 31% आहे.

मध्य रेल्वे नियमितपणे अमन लॉज ते माथेरान दरम्यान प्रवाशांसाठी शटल सेवा चालवते. ही आकडेवारी या पर्यटन स्थळी येणाऱ्या प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास उपलब्ध करून देण्यात रेल्वेची महत्त्वाची भूमिका दर्शवते. मध्य रेल्वे माथेरान हे ठिकाण केवळ एक प्रमुख पर्यटन स्थळच नाही तर निसर्गाच्या जवळ जाणारे ठिकाण म्हणूनही लोकप्रिय करत आहे. हे टॉय ट्रेनमधील अविस्मरणीय राईडसह निसर्ग जवळून पाहण्याचा थरार प्रदान करते आणि त्यामुळे माथेरानच्या नैसर्गिक वातावरणातील शांततेत रममाण होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.