१ नोव्हेंबरपासून काय बदलणार? सामान्यांच्या जीवनावर होईल थेट परिणाम

128

नोव्हेंबर महिन्यापासून होणाऱ्या बदलांचा परिणाम थेट परिणाम तुमच्या आयुष्यावर होऊन यामुळे अर्थातच आर्थिक गणितं बदलणार आहेत. एलपीजी गॅस सिलेंडर, विमा, कारमध्ये सीटबेल्ट बंधनकारक, GST रिटर्न कोड क्रमांक, रेल्वेचे वेळापत्रक बदलणार असून मुंबईत पहिल्या हायस्पीड वॉटरटॅक्सीचा शुभारंभ १ नोव्हेंबरपासून होणार आहे. याविषयी माहिती सविस्त माहिती जाणून घेऊयात…

( हेही वाचा : १ नोव्हेंबरपासून सीटबेल्ट बंधनकारक! RTO कडूनही सक्ती; अन्यथा होणार कारवाई )

१ नोव्हेंबरपासून काय बदलणार?

GST रिटर्न कोड क्रमांक

जीएसटी रिटर्नच्या नियमांमध्ये बदल करण्यात येणार असून आता ५ कोटींपेक्षा कमी टर्नओव्हर असलेल्या करदात्यांना जीएसटी रिटर्नमध्ये चार अंकी HSN कोड नमूद करणे अनिवार्य असणार आहे. याआधी दोन आकडी HSN कोड नमूद करावा लागत होता.

रेल्वेचे वेळापत्रक बदलणार

कोकण रेल्वेसह भारतातील महत्त्वांच्या गाड्यांच्या वेळांमध्ये १ नोव्हेंबरपासून बदल होऊन नवे वेळापत्रक लागू करण्यात आले आहे. १ नोव्हेंबरपासून कोकण रेल्वेच्या सर्व गाड्यांसह सुपरफास्ट राजधानी एक्स्प्रेसच्या वेळेत बदल होणार आहे. तसेच आता आपल्याला कोकणात डबल डेकर ट्रेन धावताना दिसणार नाही कारण, या गाडीचे विलिनीकरण करण्यात येणार आहे.

कारमध्ये सीटबेल्ट सक्ती

वाहतूक पोलिसांनी १ नोव्हेंबरपासून कारमध्ये बसलेल्या सहप्रवाशांना सुद्धा सीटबेल्ट सक्ती केली आहे. या नियमांचे पालन न करणाऱ्या वाहन चालन आणि मालकाविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. कारमध्ये आवश्यक बदल करण्यास सरकारने आधीच मुदत दिली होती.

विमा पॉलिसींसाठी केवायसी अनिवार्य

१ नोव्हेंबरपासून विमा पॉलिसींसाठी केवायसी अनिवार्य होईल. आरोग्य आणि सामान्य विम्यासाठी KYC पडताळणी अनिवार्य करण्यात आल्याचे भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) ने स्पष्ट केले आहे.

वॉटर टॅक्सी सुरू होणार

वॉटर टॅक्सी सुरू होण्याची अनेकजण वाट पाहत आहेत. १ नोव्हेंबरपासून मुंबई क्रूझ टर्मिनल ते मांडवा अशी वॉटर टॅक्सी सुरू होणार आहे. वॉटर टॅक्सी सुरू झाल्याने मुंबई ते मांडवा हा प्रवास अवघ्या ४५ मिनिटांत पूर्ण करणे शक्य होणार आहे. दिवसाला ६ फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. प्रवाशांना यासाठी ४०० रुपये दर आकारण्यात येणार आहे.

ओटीपी सांगितल्यावर सिलेंडर

घरगुती सिलेंडर आणणाऱ्या डिलिव्हरी बॉयला ओटीपी सांगावा लागणार आहे. सिलेंडर बुकिंग करताना तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर ओटीपी पाठवण्यात येईल. हा ओटीपी तुम्हाला संबंधित कर्मचाऱ्याला सांगावा लागणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.