‘आरे’त दीड वर्षांच्या मुलीवर झालेल्या हल्ल्यानंतर बिबट्यांना एकामागो माग पकडण्याचे सत्र वनविभागाकडून सुरुच राहणार आहे. हल्ला झाल्यानंतर दोन बिबटे पकडले गेले. आता या बिबट्यांची आई किंवा त्यांची बहिण सी ५७ यापैकी एका बिबट्याला पकडण्यामागे वनविभागाच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. यापैकी रविवारी पकडला गेलेला बिबट्या हा हल्लेखोर नसल्याने रविवारीच त्याला नैसर्गिक अधिवासात सोडला गेला.
बिबट्याचा शोध सुरू
गेल्या बुधवारपासून वनविभागाच्या ताब्यात सी ५५ हा साडेतीन वर्षांचा बिबट्या आहे. आरेतील मॉडर्न बेकरी परिसरातून पहाटे साडेपाच वाजता त्याला जेरबंद केले गेले. सुरुवातीला या बिबट्याने हल्ला केला असावा, अशी चर्चा होती. त्यानंतर सी ५५ नर बिबट्याच्या भावाचा सी ५६ चा शोध सुरु झाला. या दोन्ही बिबट्यांची आई बियंकावरही संशय व्यक्त करण्यात आला. आता या सर्व घडामोडीत तिन्ही बिबटे सोडून बियंकाची मुलगी असलेल्या सी ५७ वर संशय व्यक्त केला जात आहे. एका गटाकडून बियंका तर दुस-या गटाकडून सी ५७ ने इतिका लोटवर हल्ला केल्याचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. या सर्व घडामोडींत सी ५६ शनिवारी रात्रीपासून रविवारच्या पहाटेपर्यंंत चित्रनगरीतील बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीजवळ फिरत होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या ट्विटर या समाजमाध्यमावर मुख्य प्रवेशद्वाराजवळून बिबट्या गेल्याचे चित्रही पोस्ट केले गेले. त्यामुळे हल्लेखोर बिबट्या ओळखण्याबाबत बियंका आणि त्यांच्या तिन्ही मुलांवरुन एकमत होताना वनविभाग आणि वन्यप्रेमी संस्था यांमध्ये दुमत होत असताना दिसून येत आहे.
(हेही वाचा boycott adipurush : ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा निर्माता घाबरला, प्रदर्शनाची तारीख ढकलली पुढे)
Join Our WhatsApp Community