शहराच्या पालकमंत्र्यांनी अचानकपणे अतिरिक्त आयुक्तांसह उपायुक्तांची घेतली शाळा, पण आयुक्त मुख्यमंत्र्यासमवेतच्या बैठकीला उपस्थित

138

मुंबई शहराचे पालकमंत्री दिपक केसरकर यांनी मागील काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या आयुक्तांसह इतर अधिकाऱ्यांकडून विविध विभागांचा आढावा घेतला. मात्र, सोमवारी पालकमंत्री दिपक केसरकर यांनी कोणत्याही प्रकारची आगावू कल्पना न देताच अचानक महापालिका मुख्यालयात येत असल्याचा संदेश देत महापालिका आयुक्तांसह अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्तांची शाळा घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पालकमंत्र्यांनी पूर्व कल्पना दिल्याने महत्वाच्या बैठकीकरता महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल हे मुख्यमंत्र्यांनी आयोजित बैठकीला हजर राहण्यासाठी निघून गेले. त्यामुळे पालकमंत्र्यांनी चार अतिरिक्त आयुक्तांसह उपायुक्तांकडून माहिती जाणून घेत संध्याकाळी उशिरा मुख्यलय सोडले. यापूर्वी घेतलेल्या आढावा बैठकीतील आश्वासनांच्या पुर्ततेच्या दृष्टीकोनातून आढावा घेण्यासाठी ही बैठक केसरकर यांनी घेतल्याचे बोलले जात असले तरी या बैठकीमागील कारण काही वेगळेच असल्याचे बोलले जात आहे.

( हेही वाचा : १ नोव्हेंबरपासून सीटबेल्ट बंधनकारक! RTO कडूनही सक्ती; अन्यथा होणार कारवाई )

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमधील मुंबई शहराचे पालकमंत्री दिपक केसरकर यांनी सोमवारी अचानक महापालिका मुख्यालयातच धाव घेतली. महापालिका आयुक्तांच्या दिवसभराच्या कार्यक्रमांमध्ये शहराचे पालकमंत्री यांच्यासमवेतच्या बैठकीचे नियोजन नव्हते. मात्र दुपारी दोन वाजता केसरकर हे महापालिका मुख्यालयात येत असून तीन वाजता आयुक्तांसह ते बैठक घेत असल्याचा संदेश प्राप्त झाला. त्यानुसार महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्यासह अतिरिक्त आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच सहआयुक्त व उपायुक्तांसमवेत तीनच्या बैठकीला उपस्थित राहिले. परंतु प्रत्यक्षात ४ वाजता पालकमंत्र्यांचे आगमन महापालिका मुख्यालयात झाले. तोपर्यंत तीन वाजल्यापासून सर्व अतिरिक्त आयुक्त व उपायुक्त हे बैठकीला बसून राहिले. परंतु चार वाजता पालकमंत्र्यांचे आगमन झाले असले तरी मंत्र्यालयात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत ६ डिसेंबरच्या चैत्यभूमीसंदर्भात कार्यक्रमाच्या आढावासंदर्भात पूर्व नियोजित बैठक असल्याने महापालिका आयुक्त चहल हे पालकमंत्र्यांची सभा सोडून गेले. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे, आशिष कुमार शर्मा, पी वेलरासू आणि संजीव कुमार आदींनी या बैठकीत पालकमंत्र्यांना माहिती देण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी शहराचे जिल्हाधिकारी आर.डी.निवतकर यांनीही पालकमंत्र्यांना कल्पना देत मुख्यमंत्र्यांसमवेतच्या बैठकीला निघून गेले.

त्यामुळे पालकमंत्र्यांना अतिरिक्त आयुक्तांसह सहआयुक्त व उपायुक्त यांच्यासमवेत बैठक घेत महत्वाच्या विषयांवर पुन्हा चर्चा केली. विशेष म्हणजे मुंबई महापालिकेतील नोव्हेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीतील अनेक प्रस्तावांच्या कंत्राट कामांची विशेष कॅग चौकशी करण्याचे आदेश राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे पालकमंत्र्यांनी अचानकपणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत याच विषयांवर चर्चा करण्यासाठी अचानक भेट तर दिली नाही ना अशाप्रकारचे प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होऊ लागले आहेत.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.