मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टिम मधील एअर ब्लॅडर बदलण्याचे काम मंगळवारी १ नोव्हेंबर २०२२ रोजी हाती घेण्यात येणार आहे, हे काम गुरुवारी १० नोव्हेंबर २०२२ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यामुळे या कालावधीत मुंबईसह मुंबई महानगरपालिकेतर्फे ठाणे व भिवंडी महानगरपालिकेस होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. या दुरुस्ती कामाच्या कारणास्तव मंगळवारी १ ते गुरुवारी १० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत मुंबई महानगरात आणि मुंबई महानगरपालिकेतर्फे ठाणे व भिवंडी महानगरपालिकेस होणाऱ्या पाणीपुरवठ्यात १० टक्के पाणी कपात करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या जलअभियंता विभागाने स्पष्ट केले.
( हेही वाचा : पंढरपूरला जाणाऱ्या दिंडीत कार घुसली; ६ वारकऱ्यांचा मृत्यू)
या कपातीच्या कालावधीत पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, अशी विनंती महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community