मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याआधी योग्यता तपासा! नरेश म्हस्के यांचा आदित्य ठाकरेंवर घणाघात

158

आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन ज्या काही तारखा आकडे जाहीर केलेले आहेत, त्याच्यावरून खात्रीच झाले आहे हे जे प्रकल्प आहेत ते तीन साडेतीन महिन्यांपूर्वीच महाराष्ट्र बाहेर गेलेले आहेत. त्याला कारणीभूत तेच आहेत. तुम्ही कोण, तुमचे वय किती, पक्षांमध्ये किती काम केले, तुमचे जेवढे वय आहे त्याच्यापेक्षा जास्त वर्ष या शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांनी काम केले आहे. आपली योग्यता तपासावी, माजी मुख्यमंत्र्यांना बोलायला सांगा. आपले काम कधी पाहिले का, काम कधी तपासले का, आपली योग्य तपासावी, आतापर्यंत मुख्यमंत्री अद्यापही आपल्या विरुद्ध काही बोलेल नाहीत. बाळासाहेबांच्या संस्कृतीमध्ये ते वाढलेले आहेत आणि बाळासाहेबांच्या संस्कृतीप्रमाणे वागतात, असे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के म्हणाले.

मुंबई महापालिकेतील खोके जनतेला कळतील 

आपण फक्त वारसा घेतलेला आहे. ती संस्कृती अंगीकारली नाही. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारचे बोलत आहेत. खोके खोके काय बोलताय, कॅगच्या चौकशीला सामोरे जा, बारा हजार करोड रुपयांचा जो काही मुंबई महापालिकेत तुम्ही घोटाळा केला आहे, जनतेला कळेल आपण खोके कुठे लपवून ठेवले आहेत? तुमचे खोके बाहेर येणार आहेत आणि म्हणून तुम्ही आता महाराष्ट्राची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रकल्प राज्याबाहेर गेले ते तुमच्या निष्क्रियतेमुळे गेले आहेत, असे नरेश म्हस्के म्हणाले.

(हेही वाचा महाराष्ट्राची दिशाभूल करू नका! आदित्य ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार )

बालिशपणा महाराष्ट्राला समजला 

कारण आपण बंद रुमच्या बाहेर कधी आलाच नाहीत. चिंता करू नका, या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम बनवण्याचे काम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री करणार आहेत. आदित्य ठाकरे आता तुम्हाला साहेब म्हणायला नको, पण आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या संस्कृतीमध्ये वाढलेला आहोत म्हणून आम्ही तुम्हाला बोलतोय आपली योग्यता तपासा आणि नंतरच मुख्यमंत्र्यांवरती आरोप करा. आपला बालिशपणा अख्ख्या महाराष्ट्राला माहित पडलेला आहे, अशा शब्दांत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.