मोरबी पीडितांना सर्वतोपरी मदत करावी: पंतप्रधान नरेंद्र मोदी

140

राजभवन, गांधीनगर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत, मोरबी दुर्घटनेच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. या उच्चस्तरीय बैठकीला मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गृहराज्य मंत्री हर्ष संघवी, मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक तसेच, गुजरातच्या गृह मंत्रालयातले आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे उच्चाधिकारी उपस्थित होते.

मोरबीत अपघात घडल्यापासून घटनास्थळी करण्यात येणाऱ्या बचाव आणि मदतकार्याबद्दल पंतप्रधानांना माहिती देण्यात आली. या दुर्घटनेशी संबंधित सर्व पैलूंवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. पंतप्रधानांनी पुन्हा एकदा, पीडितांना शक्यतो सर्व मदत केली जावी यावर भर दिला.

( हेही वाचा: भारताचा स्वत:चा डिजिटल रुपया आला; आता रोख रक्कम ठेवावी लागणार नाही, ‘हे’ आहेत फायदे )

मदतीची घोषणा

मृतांच्या नातलगांना पंतप्रधान राष्ट्रीय साहाय्यता निधीमधून दोन लाखांचे सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे. तर गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनीही मृतांच्या नातलगांना चार लाख तर जखमींना प्रत्येकी 50 हजारांची मदत जाहीर केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी या दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.