“…तर बुधवारपर्यंत मी राजीनामा देईन”, असं का म्हणाले अब्दुल सत्तार?

162

शिवसेनेत दोन गट पडल्यापासून शिंदे गटातील नेते आणि उद्धव ठाकरेंच्या गटातील नेते एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यातच कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची सतत मागणी केली जात आहे. या सर्व आरोपांवरच बोलताना अब्दुल सत्तार यांनी विरोधकांना उत्तर दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली तर बुधवारपर्यंत मी राजीनामा देऊ शकतो. मात्र, त्यानंतर आदित्य ठाकरे यांनीदेखील राजीनामा देऊन सिल्लोडमधून निवडणूक लढवून दाखवण्याची हिंमत करावी, असे अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे.

( हेही वाचा: भारताचा स्वत:चा डिजिटल रुपया आला; आता रोख रक्कम ठेवावी लागणार नाही, ‘हे’ आहेत फायदे )

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परवानगी देताच, मी राजीनामा देण्यासाठी तयार आहे. मात्र चंद्रकांत खैरे आणि आदित्य ठाकरे यांनी माझ्याविरुद्ध निवडणूक लढवून सिल्लोडमधून विजयी होऊन दाखवावे, असे आव्हान अब्दुल सत्तार यांनी केले आहे. ते औरंगाबाद येथे माध्यमांशी बोलत होते.

सत्तारांचा ठाकरेंना टोला

अब्दुल सत्तार आणि हिंदुत्व यांचा संबंध काय? या प्रश्नाला उत्तर देताना सत्तार म्हणाले की, जेव्हा मी उद्धव ठाकरेंच्या पक्षात होतो तेव्हा त्यांना मी हिंदुत्ववादी वाटत होतो. आता पक्ष सोडला म्हणून लगेच त्यांच्यादृष्टीने वाईट झालो का? असा टोलादेखील सत्तार यांनी यावेळी लगावला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.