नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS) मध्ये पैसे गुंतवल्यानंतर, गुंतवणूकदाराच्या मृत्यूनंतर पैसे नॉमिनी असणाऱ्या व्यक्तीला दिले जातात. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) द्वारे तयार केलेल्या नियमांनुसार, NPS खात्यात जमा केलेल्या पैशाचा हक्क हा केवळ नॉमिनीचा असतो. परंतु, NPS मधील गुंतवणूकदाराने जर नॉमिनीची निवड केली नसेल आणि त्याचा मृत्यू झाला तर नॉमिनी कोण असणार हा प्रश्न उपस्थित होतो. मात्र यावर पीएफआरडीएने नॉमिनीशी संबंधित काही नियम स्पष्ट केले आहेत.
(हेही वाचा – नक्षलवाद्यांची थेट मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीला लाल शाईत जीवे मारण्याची धमकी!)
पेन्शन फंड रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) आणि इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया (IRDAI) राष्ट्रीय पेन्शन प्रणालीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी वेळोवेळी पावले उचलत आहेत. यासाठी पीएफआरडीए आणि आयआरडीएआयकडूनही नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत, जर तुम्ही तुमच्या सेवानिवृत्तीसाठी NPS मध्ये गुंतवणूक करत असाल, तर तुम्हाला PFRDA आणि IRDAI द्वारे अलीकडेच बदललेले नियम माहित असले पाहिजेत.
NPS नॉमिनेशनबाबत हे आहेत बदललेले नियम
पेन्शन नियामकाने सरकारी आणि खाजगी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी ई-नॉमिनेशनची प्रक्रिया बदलली आहे. नव्या नियमानुसार आता तुमचा अर्ज मंजूर किंवा नाकारण्याचा अधिकार नोडल ऑफिसरला असतील. दुसरीकडे, जर नोडल ऑफिसरने तुमच्या ई-नामांकन अर्जावर ३० दिवसांच्या आत कोणतीही कारवाई केली नाही, तर तुमचा अर्ज आपोआप सेंट्रल रेकॉर्डकीपिंग एजन्सी (CRA) कडे जाईल आणि स्वीकारला जाईल. हा नियम 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू झाला असल्याचे सांगितले जात आहे.
1. मॅच्युरिटीवर अॅन्युइटीसाठी वेगळा फॉर्म आवश्यक नाही
NPS मधील गुंतवणूक सुलभ करण्याच्या उद्देशाने, आयआरडीएआय सातत्याने नियम सुलभ करत आहे. अलीकडेच, आयआरडीएआयने मॅच्युरिटीच्या वेळी अॅन्युइटी घेण्यासाठी स्वतंत्र फॉर्म भरण्याची प्रक्रिया बंद केली आहे. त्यामुळे त्यासाठी कोणताही वेगळा फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही.
2. डिजिटल लाइफ सर्टिफिकेट
पेन्शन सुरू ठेवण्यासाठी प्रत्येक पेन्शनधारकाला दरवर्षी पेन्शन प्राधिकरणाकडे लाइफ सर्टिफिकेट सादर करावे लागते. आता डिजिटल लाइफ सर्टिफिकेट हे ऑनलाइन सादर करता येणार आहे. यासोबतच विमा नियामकाने सर्व विमा कंपन्यांना आधार- व्हेरिफाईड लाइफ सर्टिफिकेट स्वीकारण्यास सांगितले आहे.
3. क्रेडिट कार्डद्वारे NPS मध्ये योगदान
पीएफआरडीएने जारी केलेल्या आदेशानुसार, 3 ऑगस्ट 2022 पासून, टियर 2 शहरांमधील NPS खातेधारक यापुढे क्रेडिट कार्डद्वारे NPS मध्ये गुंतवणूक करू शकणार नाहीत. मात्र ही सुविधा टियर 1 शहरांतील खातेधारकांसाठी अद्यापही उपलब्ध आहे.
Join Our WhatsApp Community