पुणे ग्रामीण विभागात अनिश्चित काळासाठी सीएनजी पंप बंद, कर्मचा-यांचा बेमुदत संप

175

पुणे ग्रामीण भागातील सीएनजी पंप हे अनिश्चित काळापर्यंत बंद राहणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची मोठी अडचण होणार असल्याचे सांगितले जात आहे. एमओपीएनजी परिपत्रकानुसार,सुधारित व्यापार मार्जिन मिळेपर्यंत मंगळवारपासून हे सीएनजी पंप बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पेट्रोल डीलर्स असोसिएशनतर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे.

1 नोव्हेंबर पासून सीएनजी पंप बंद

या निर्णयामुळे पुण्याच्या ग्रामीण भागातील सीएनजी पंप 1 नोव्हेंबरपासून बंद राहणार आहेत. पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे कर्मचारी बेमुदत संपावर जात आहेत, त्यामुळे या संपावर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत हा बेमुदत संप असाच सुरू राहील, असा इशाराही पेट्रोल डीलर्स असोसिएशनच्या कर्मचा-यांनी दिला आहे.

संपावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न

या संपाचा पुण्याच्या ग्रामीण भागातील सीएनजी वाहनधारकांना मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे कर्मचा-यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. त्यासाठी पुण्यात शुक्रवारी महत्वाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला जिल्हाधिकारी राजेश देशमुख, एचपीसीचे कार्यकारी संचालक,आयओसी,बीपीसीएल आणि टोरेंट गॅस,पीडीए आणि जिल्हा पुरवठा अधिकारी उपस्थित होते. यावेळी टोरेंट सीएनजी पंप चालकांनी आपल्या मागण्या प्रशासनापुढे मांडल्या आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.