ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक स्पर्धा सुरु आहेत. भारतीय संघ टी-20 विश्वचषक स्पर्धेत आता बांग्लादेशविरुद्ध मैदानात उतरणार आहे. ऑस्ट्रेलियातील अॅडलेडच्या मैदानावर 2 नोव्हेंबरला हा सामना खेळला जाणार आहे. विश्वचषकात पुढील फेरीत प्रवेश करण्यासाठी दोन्ही संघासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. विशेष म्हणजे, याआधी या दोन संघांमध्ये 11 टी 20 सामने झाले आहेत, ज्यामध्ये भारतीय संघाने 10 सामने जिंकले असून बांग्लादेश केवळ एकदा जिंकले आहे. 2 नोव्हेंबरला होणा-या या सामन्यापूर्वी दोन्ही संघ आमने- सामने आले असतानाचे काही खास रेकाॅर्ड्स पाहूया.
( हेही वाचा: माथेरान-नेरळ मिनी ट्रेन मार्गावर रेल्वे स्लीपरचा तुकडा; थोडक्यात टळला अनर्थ )
- सर्वाधिक धावसंख्या– टीम इंडियाने 6 जून 2009 रोजी बांग्लादेशविरुद्ध 5 विकेट्स गमावत 180 रन केले होते.
- सर्वात कमी धावसंख्या– मीरपूर येथे 24 फेब्रुवारी 2016 मध्ये झालेल्या टी-20 सामन्यात बांग्लादेशचा संपूर्ण संघ 121 रनवर ऑलआऊट झाला होता.
- सर्वात मोठा विजय– टीम इंडियाने फेब्रुवारी 2016 मध्ये मीरपूर T-20 मध्ये बांग्लादेशचा 45 धावांनी पराभव केला होता. धावांच्या बाबतीत हा सर्वात मोठा विजय आहे. तर मार्च 2014 मध्ये भारताने बांग्लादेशचा 8 गडी राखून पराभव केला होता. विकेट्सच्या बाबतीत हा सर्वात मोठा विजय ठरला.
- सर्वोत्तम खेळी– रोहित शर्माने मार्च 2018 मध्ये कोलंबो येथे झालेल्या T-20 सामन्यात 61 चेंडूत 89 धावा केल्या होत्या.
- सर्वाधिक षटकार – रोहित शर्माने बांग्लादेशविरुद्ध टी-20 क्रिकेटमध्ये 21 षटकार ठोकले आहेत.
- सर्वाधिक विकेट्स– युजवेंद्र चहलने भारत -बांग्लादेश सामन्यात 9 विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्याची गोलंदाजी सरासरी 17 आणि इकाॅनाॅमी रेट 6.37 होता.
- सर्वोत्कृष्ट गोलंदाजी– दीपक चहरने नोव्हेंबर 2019 मध्ये नागपूर T-20 मध्ये 7 धावा देत 6 विकेट्स घेतल्या होत्या.
- सर्वोत्तम विकेटकिपिंग– एमएस धोनीने 5 सामन्यात 7 बळी यष्टीरक्षक म्हणून घेतले आहेत. त्याने 3 झेल आणि 4 स्टंपिंग केले आहेत.