पुण्यातील वारजे परिसरात सापडले धारदार शस्त्रांसह जिवंत काडतुसे

152

पुण्यातील वारजे परिसरात जिवंत काडतुसे आणि धारदार शस्त्रास्त्रे सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे महापालिकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नाले सफाई करताना ही जिवंत काडतुसे आणि धारदार शस्त्रास्त्रे भरलेली पिशवी सापडली आहे.

काय घडला प्रकार

पुणे महापालिकेत काम करणारे शरद पाटोळे हे पुणे महानगरपालिकेत घनकचरा विभागामध्ये मुकादम म्हणून काम करतात. सोमवारी सकाळी ७ वाजता ते त्यांच्या सहा कर्मचाऱ्यांसोबत पुणे बैंगलोर हायवे जवळील पॉप्युलर नगर समोरील नाल्यातील कचरा काढण्याचे काम करत असताना एका पिशवीत ही धारदार शस्त्रे व बंदूकीची १५ जिवंत काडतुसे सापडली आहेत.

(हेही वाचा – वन मॅन शो! संचालक मंडळ बरखास्त, आता एलॉन मस्क स्वत: बनणार ट्विटरचे CEO!)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे महापालिकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कचरा साफ करत असताना सापडलेल्या पिशवीत ३ चॉपर, ३ मूठ, ३ गुप्ती, लोखंडी फायटर तसेच बंदुकीचे १५ जिवंत काडतूसे सापडले. ही सर्व शस्त्रास्त्रे व काडतुसे ताब्यात घेण्यात आली आहेत. तर अज्ञाताविरोधात कलम ३, ४ (२५) भारतीय हत्यार कायदा प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीसांचे पथक पुढील तपास करत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.