ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले यांच्यावर आरोप करणारे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना लाचलुचपत विभागाकडून अटक करण्यात आली आहे. 25 हजार रुपयांची लाच घेताना लोहार आणि त्यांच्या एका कर्मचा-यास लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले आहे.
ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले यांच्यावर किरण लोहार यांनी आरोप केले होते. त्यानंतर आता लोहार यांनाच लाच घेताना अटक करण्यात आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
(हेही वाचाः EPFO ने केले पेन्शनच्या नियमांत मोठे बदल, ग्राहकांना होणार फायदा)
लाचलुचपत विभागाची कारवाई
स्वयं अर्थसहाय्य शाळेच्या युडायसवर सही करण्यासाठी शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी 25 हजार रुपये लाच मागितली होती. याबाबतची तक्रार मिळाल्यानंतर लाचलुचपत विभागाने सोमवारी संध्याकाळी सापळा रचला आणि तक्रारदाराला रक्कम घेऊन जाण्यास सांगितले. त्यानंतर लोहर यांना प्रत्यक्ष लाच घेताना लाचलुचपत विभागाने अटक केली.
डिसलेंवर केले होते आरोप
डिसले यांच्यावर लोहार यांनी गंभीर आरोप केले होते. त्यानंतर डिसले यांनी राजीनामा देण्याची भूमिका घेतली होती. 7 जुलै रोजी डिसले यांनी माढा तालुक्याच्या गटशिक्षणाधिका-यांकडे राजीनामा सोपवला होता. सातत्याने गैरहजर राहिल्याप्रकरणी सोलापूर जिल्हा परिषदेने रणजितसिंह डिसले यांची चौकशी लावली होती. त्यानंतर चौकशीचा अहवाल शिक्षण विभागाने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे सोपवला होता. पण त्याआधीच डिसले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.
Join Our WhatsApp Community