गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी 15 हजार रुपयांची लाच मागणा-या सावदा पोलिस ठाण्याच्या दोन पोलिस अधिका-यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. या दोन्ही अधिका-यांविरोधात सावदा पोलिस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक समाधान गायकवाड आणि सहायक पोलिस निरीक्षक देविदास इंगोले अशी या अधिका-यांची नावे आहेत.
काय आहे प्रकरण?
एका अल्पवयीन मुलीला पळवून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी मुलगा आकाश कुमावत याच्याविरुद्ध सावदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी मुलाला 27 ऑगस्ट रोजी पोलिसांनी अटक केली होती. तेव्हा त्यांचे कुटुंबीय हे आपल्या मुलाला भेटण्यासाठी पोलिस ठाण्यात गेले असता गुन्ह्याचे तपास अधिकारी उपनिरीक्षक समाधान गायकवाड यांनी तुमचा मुलगा मुलीली घेऊन जिथे थांबला होता तिथे तुम्ही,तुमची पत्नी,भाऊ व बहीण देखील होते. त्यामुळे मुलाव्यतिरिक्त त्यांच्यावर गुन्हा दाखल न करण्यासाठी गायकवाड यांनी 60 हजार रुपयांची लाच मागण्यात आली. तडजोडीनंतर 15 हजार लाच देण्याचे ठरले.
(हेही वाचाः ग्लोबल टीचर डिसलेंवर आरोप करणारा शिक्षणाधिकारीच गजाआड, काय आहे कारण)
बैठकीआधीच अटक
गायकवाड यांना यामध्ये इंगोले यांनी प्रोत्साहन दिल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर तातडीने लाचलुचपत प्रकिबंधक विभागाने कारवाई करत मंगळवारी सकाळी 8 वाजता इंगोले आणि गायकवाड यांना अटक केली. अटक केल्यानंतर या दोघांनाही सावदा येथून जळगावात आणण्यात आले. जळगाव जिल्हा पोलिस दलाची मंगळवारी सकाळी 10 वाजता बैठक होती. नव्याने पदभार स्विकारणारे पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांची ही पहिलीच बैठक होती. यासाठी जळगावला जाण्याच्या तयारीत असतानाच इंगोले आणि गायकवाड यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले.
Join Our WhatsApp Community