ई-लर्निंग प्लॅटफॉर्म Byju’s मधून अडीच हजार कर्मचा-यांना काढून टाकणार! सीईओने मागितली माफी, म्हणाले…

155

सध्या देशात प्रसिद्ध असलेला ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म बायजूज मधून अडीच हजार कर्मचा-यांना काढून टाकण्यात येणार आहे. कंपनीचे संस्थापक आणि सीईओ बाजयू रविंद्रन यांनी याबबातची माहिती दिली आसून त्यांनी कर्मचा-यांची माफी देखील मागितली आहे. त्यामुळे देशातील मोठ्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्ममधून अशाप्रकारे कर्मचा-यांची कपात का करण्यात येत आहे, असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

काय आहे कारण?

ऑक्टोबरमध्येच बायजूज कडून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. नफा मिळवण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागते.आर्थिक कारणांमुळे मला हा निर्णय घेणं भाग आहे. यामुळे कंपनीला आर्थिकदृष्ट्या स्थिर ठेवण्यावर लक्ष केंद्रित करता येईल, असे बायजू रविंद्रन यांनी कर्मचा-यांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये म्हटलं आहे.

(हेही वाचाः EPFO ने केले पेन्शनच्या नियमांत मोठे बदल, ग्राहकांना होणार फायदा)

कर्मचा-यांची मागितली माफी

आर्थिक नफा मिळवण्यासाठी बायजूज कडून कठोर मेहनत घेण्यात येत आहे. ऑरगॅनिक आणि इनऑरगॅनिक ग्रोथमुळे सध्या कंपनीत काही डुप्लिकेशन्स निर्माण झाली आहेत. जी शोधून दुरुस्त करणे गरजेचं आहे. यासाठीच कंपनी आपल्या 5 टक्के म्हणजेच अडीच हजार कर्मचा-यांना काढत आहे. ज्यांना नोकरीवरुन काढून टाकण्यात येत आहे त्यांच्याबद्दल मला वाईट वाटत आहे. त्यामुळे याबाबत मी तुमची माफई मागतो, असंही रविंद्रन यांनी कर्मचा-यांना पाठवलेल्या मेलमध्ये म्हटलं आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.