सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; IBPS अंतर्गत बंपर भरती सुरू! असा करा अर्ज

147

IBPS अंतर्गत विविध तज्ञ अधिकाऱ्यांच्या एकूण ७१० रिक्त पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. IBPS ने विविध क्षेत्रांसाठी ही जाहिरात प्रकाशित केली आहे. अधिकारी (स्केल – १), कृषी क्षेत्र अधिकारी ( स्केल १), राजभाषा अधिकारी, कायदा अधिकारी, एचआर/कार्मिक अधिकारी आणि मार्केटिंग अधिकारी इत्यादी पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. IBPS SO भरतीसाठी ऑनलाईन नोंदणी १ नोव्हेंबर २०२२ पासून सुरू होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ नोव्हेंबर २०२२ आहे.

( हेही वाचा : T-20 World Cup: भारत- बांग्लादेश आमने -सामने; या सामन्यांदरम्यानचे ‘हे’ खास रेकाॅर्ड माहित आहेत का?)

अटी व नियम जाणून घ्या…

  • पदाचे नाव – I.T. अधिकारी, कृषी क्षेत्र अधिकारी, राजभाषा अधिकारी, कायदा अधिकारी, एचआर/कार्मिक अधिकारी, विपणन अधिकारी
  • पदसंख्या – ७१० जागा
    आयटी अधिकारी ( स्केल – १) – ४४
    कृषी क्षेत्र अधिकारी ( स्केल-१) – ५१६
    राजभाषा अधिकारी ( स्केल – १) – २५
    कायदा अधिकारी (स्केल – १) – १०
    एचआर/कार्मिक अधिकारी (स्केल-१) – १५
    विपणन अधिकारी (स्केल – १) – १००
  • अर्ज शुल्क – SC/ST/PWBD – १७५ रुपये/ इतर – ८५० रुपये
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – १ नोव्हेंबर २०२२
    अर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ नोव्हेंबर २०२२
  • अधिकृत वेबसाईट – www.ibps.in

परीक्षा दिनांक

  • IBPS SO पूर्व परीक्षा २०२२ – २४ आणि ३१ डिसेंबर २०२२
  • IBPS SO मुख्य परीक्षा २०२२ – २९ जानेवारी २०२३
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.