GST Collection: ऑक्टोबरमध्ये उच्चांकी GST संकलन, महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा

146

ऑक्टोबर 2022 मध्ये एकत्रित जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवाकर महसूल संकलन 1,51,718 कोटी रुपये इतके झाले आहे. याआधी एप्रिल महिन्यात सर्वाधिक जीएसटी जमा झाला होता. देशातील राज्यांमध्ये महाराष्ट्रातून सर्वाधिक जीएसटी जमा झाला. यामध्ये सीजीएसटी अर्थात केंद्रीय वस्तू आणि सेवा करापोटी 26,039 कोटी, एसजीएसटी अर्थात राज्य सरकारच्या वस्तू आणि सेवा करापोटी 33,396 कोटी, आयजीएसटी म्हणजेच एकात्मिक वस्तू आणि सेवा करापोटी 81,778 कोटी (माल आयातीवर संकलित केलेल्या रु. 37,297 कोटींसह) आणि उपकर 10,505 कोटी रुपये (मालाच्या आयातीवर संकलित केलेल्या रु. 825 कोटींसह) यांचा समावेश आहे. आत्तापर्यंतचा दुसरा उच्चांक आहे.

सरकारने समझोत्याच्या स्वरूपात आयजीएसटीमधून सीजीएसटीला 37,626 कोटी रुपये आणि सीजीएसटीला 32,883 कोटी रुपये चुकते केले आहेत. याव्यतिरिक्त, केंद्र आणि राज्यांमधे 50:50 च्या प्रमाणात, त्या आधारावर 22,000 कोटी रुपये देखील चुकते केले आहेत.नियमित समझोत्यानंतर ऑक्टोबर 2022 मध्ये केंद्र आणि राज्यांचा एकूण महसूल सीजीएसटीसाठी 74,665 कोटी रुपये आणि एसजीएसटी साठी 77,279 कोटी रुपये आहे.ऑक्टोबर 2022 चा महसूल हा एप्रिल 2022 मधील संकलनानंतरचे दुसरे उच्चांकी मासिक संकलन आहे. जीएसटीने दुसर्यांदा मासिक 1.50 लाख कोटी संकलनाचा टप्पा पार केला आहे. ऑक्टोबर 2022 नंतर, देशांतर्गत व्यवहारांमधून दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च संकलन देखील पाहिले गेले.

(हेही वाचा – मुंबई पोलिसांकडून बॉलिवूडच्या भाईजानला Y+ सुरक्षा, काय आहे प्रकरण?)

हा नववा महिना असून सलग आठ महिने, मासिक जीएसटी महसूल 1.4 लाख कोटींपेक्षा जास्त आहे. सप्टेंबर 2022 मध्ये, 8.3 कोटी ई-वे बिले तयार झाली. ऑगस्ट 2022 मध्ये तयार झालेल्या 7.7 कोटी ई-वे बिलांपेक्षा ती अधिक होती. तक्त्यात चालू वर्षातील मासिक एकत्रित जीएसटी महसुलातील कल दर्शवला आहे. ऑक्टोबर 2021 च्या तुलनेत ऑक्टोबर 2022 मध्ये प्रत्येक राज्यात संकलित झालेल्या जीएसटी महसुलाची राज्यनिहाय आकडेवारी तक्त्यांमध्ये दिली आहे.

trend in gst 2

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.