LIC हाऊसिंग फायनान्सला RBI चा मोठा दणका, ‘या’ कारणासाठी ठोठावला दंड

152

नियमांचे उल्लंघन केल्याबाबत देशाची मध्यवर्ती बँक असलेल्या आरबीआयकडून नेहमीच कारवाई करण्यात येते. आता LIC हाऊसिंग फायनान्सवर आरबीआयकडून अशीच एक कारवाई करण्यात आली आहे. आरबीआयने या कंपनीला 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

काय आहे कारण?

अॅसेट्समध्ये करण्यात आलेल्या गुंतवणुकीवर फ्लोटिंग चार्ज लावण्यात एलआयसी हाऊसिंग फायनान्स कंपनी अपयशी ठरल्यामुळे नॅशनल बॅंकेच्या सेक्शन 29बीचं उल्लंघन होत आहे. त्यामुळेच या कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आरबीआयने सांगितले आहे. एलआयसी हाऊसिंग फायनान्सवरील ही मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात येत आहे.

(हेही वाचाः ई-लर्निंग प्लॅटफॉर्म Byju’s मधून अडीच हजार कर्मचा-यांना काढून टाकणार! सीईओने मागितली माफी, म्हणाले…)

5 लाखांचा दंड

तसेच एलआयसी हाऊसिंग फायनान्सने रजिस्ट्रार ऑफ कंपनीकडे नोंदणीही केली नव्हती. त्यामुळे यापूर्वीच आरबीआयने एलआयसी हाऊसिंग फायनान्सला नोटीस पाठवून दंडात्मक कारवाई का करण्यात येऊ नये, अशी विचारणा केली होती. त्यानंतर अखेर आता 5 लाख रुपयांचा दंड आरबीआयने या कंपनीवर ठोठावला आहे.

या कंपन्यांवर देखील दंडात्मक कारवाई

या कंपनीसोबतच आरबीआयने म्हैसूर मर्चंट्स बँक लिमिटेडलाही पाच लाखांचा दंड ठोठावला आहे. तसेच नियमांचं योग्य पद्धतीने पालन करत नसल्याचे सांगत आरबीआयने वक्रांगी लिमिटेड या कंपनीला 1.76 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.