वाहन अपघातात प्राणी जखमी होणे गुन्हा नाही: कर्नाटक उच्च न्यायालय

145

हलगर्जीपणे वाहन चालवून अपघात केल्यामुळे प्राणी मारले गेल्यास किंवा जखमी झाल्यास आयपीसी आणि मोटार वाहन कायद्यात तो गुन्हा ठरत नाही, असे कर्नाटक उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

एक महिला तिच्या कुत्र्यांना फिरवताना वाहनाने कुत्र्याला धडक दिली व त्यात कुत्रा मृत्यूमुखी पडला. कारच्या ड्रायव्हरला मोटार वाहन कायद्याच्या कलम 134/187 आणि आयपीसीच्या कलम 279, 428 आणि 429 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर, ड्रायव्हरने फौजदारी कारवाई रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली.

( हेही वाचा: शहरात सीटबेल्ट सक्ती : प्रत्येक नियम आम्हालाच का? मुंबईकरांचा सवाल, प्रवासी, वाहनचालकांच्या नाराजीचे ‘हे’ आहे कारण! )

काय म्हणाले उच्च न्यायालय?

पाळीव कुत्र्याला दुखापत किंवा इजा पोहोचवण्याचा त्याचा कोणताही हेतू नसल्यामुळे तो निर्दोष आहे. कुत्रा रस्त्यावर आल्याने अपघात झाला असा युक्तिवाद करण्यात आला. आयपीसीच्या कलम 279 व मोटार वाहन कायद्याच्या 134 चे गुन्हे केवळ माणसांना इजा झाल्यास लागतात व प्राण्यांना झालेल्या अपघाताच्या बाबतीत ही तरतूद लागू होत नाही. तसेच, प्राण्यांच्या हत्येसंबंधी गुन्हा दाखल करण्यासाठी हेतू स्थापित करणे आवश्यक आहे, असे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.