उत्तर प्रदेशातील शाळेत शिकवले जाते A for अर्जुन, B for बलराम

174

शाळेत आतापर्यंत आपण A for apple आणि B for Ball शिकतच मोठे झालो आहोत. पण उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे अशीही एक शाळा आहे जिथे इंग्रजी अक्षरं शिकवण्यासाठी रामायण-महाभारत आणि पुराण कथांतील पात्रांचा वापर केला जात आहे. लखनऊच्या अमीनाबाद इंटर कॉलेज येथे अशा पद्धतीने इंग्रजी वर्णमाला शिकवली जाते.

मुलांना भारतीय संस्कृतीचे बाळकडून बालपणीच पाजले जावे या हेतूने हा प्रयोग करण्यात आल्याचे शाळेचे प्राध्यापक साहेब लाल मिश्रा यांनी म्हटले आहे.

(हेही वाचाः LIC हाऊसिंग फायनान्सला RBI चा मोठा दणका, ‘या’ कारणासाठी ठोठावला दंड)

ऐतिहासिक आणि पौराणिक पात्रांच्या आधारे शिक्षण

इंग्रजी वर्णमालेसोबतच हिंदी वर्णमालाही विद्यार्थ्यांना अशाच पद्धतीने शिकवण्याचा आपण प्रयत्न करत असल्याचेही प्राध्यापक मिश्रा यांनी सांगितले. इंग्रजी वर्णमाला शिकवण्यासोबतच विद्यार्थ्यांना भारताच्या प्रगल्भ अशा संस्कृतीचेही ज्ञान मिळावे, या हेतूने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. ऐतिहासिक आणि पौराणिक पात्रांचा आधार शिकण्यासाठी करण्यात आला तर तो अभ्यास गोष्टीच्या स्वरुपात येईल आणि त्याचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल, असा विश्वासही प्राध्यापक मिश्रा यांनी व्यक्त केला आहे.

अमीनाबाद इंटर कॉलेज शाळा ही लखनऊ मधील 125 वर्षे जुनी शाळा आहे. A फॉर अर्जुन, B फॉर बलराम,C फॉर चाणक्य अशा ऐतिहासिक आणि पौराणिक पात्रांच्या नावाने या शाळेत शिकवण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.