साखर हा गोड भारतीयांचा आवडता पदार्थ. चहापासून मिठाईपर्यंत सगळ्याच पदार्थांमध्ये साखरेचा सर्वाधिक वापर करण्यात येतो. पण साखरेच्या अतिसेवनाचे साईड इफेक्ट म्हणून मधुमेहाचा धोका वाढतो. याचबाबत जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या एका रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. 2025 पर्यंत भारतात मधुमेही रुग्णांच्या संख्येत दुप्पटीहून जास्त वाढ होणार असल्याचा धोका असल्याची माहिती या रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे.
WHO चा रिपोर्ट
दररोज जास्तीत जास्त सहा चमचे साखर सेवन करावी, अशी मर्यादा जागतिक स्तरावर तज्ज्ञंनी आखून दिली आहे. पण भारतीयांचे साखरेचे सेवनाचे प्रमाण हे दिवसाला 12 चमच्यांपेक्षा जास्त असल्याचे WHO च्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. भारतीयांचे साखरेच्या सेवनातील हे प्रमाण असेच कायम राहिले किंवा वाढत राहिले तर भारत एक दिवस मधुमेही रुग्णांची राजधानी म्हणून ओळखली जाईल, असा इशाराही जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.
(हेही वाचाः EPFO ने केले पेन्शनच्या नियमांत मोठे बदल, ग्राहकांना होणार फायदा)
दुप्पटीहून वाढ होण्याची शक्यता
प्रत्यक्ष साखर खाण्यापेक्षाही वविध पदार्थांच्या माध्यमातून अप्रत्यक्षरित्या पोटात साखर जाण्याचे प्रमाण अधिक असल्याचेही WHO ने या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. 2015 च्या आकडेवारीनुसार भारतात त्यावेळी 7 कोटी 20 लाख मधुमही रुग्ण होते. हा आकडा 2025 पर्यंत दुप्पटीहून जास्त होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे WHO ने साखरेच्या सेवनावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला देखील दिला आहे.
Join Our WhatsApp Community