‘…तर भाजपनेही बक्कळ पैसा कमावला असता’, फडणवीसांच्या ट्वीटची होतेय चर्चा

158

फॉक्सकॉन-वेदांता आणि एअरबस प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. यावरुन सरकारमधील नेत्यांकडून विरोधकांना चांगलेच प्रत्युत्तर देण्यात येत आहे. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावरुनच थेट ट्विटरचा मालक एलॉन मस्कच्या ट्वीटला रिट्वीट करत विरोधकांना टोला लगावला आहे. महाराष्ट्रात भाजपविरोधात फेक नरेटिव्ह पसरवण्यात येत आहे. जर या प्रत्येक फेक नरेटिव्हसाठी पैसा मोजला असता तर भाजपने बक्कळ पैसा कमावला असता, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

फडणवीस यांनी काही पत्रकारांवर टीका करताना त्यांना HMV असे म्हटले होते. त्यानंतर आता एलॉन मस्कच्या ट्वीटला रिट्वीट करत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर मिश्कील टीका केली असती.

(हेही वाचाः EPFO ने केले पेन्शनच्या नियमांत मोठे बदल, ग्राहकांना होणार फायदा)

एलॉन मस्कचे ट्वीट

उद्योगपती एलॉन मस्कने ट्विटरचे मालकत्व स्विकारल्यानंतर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट पुन्हा सुरू होणार का, असा प्रश्न विचारण्यात येत होता. याबाबत एलॉन मस्कने ट्वीट केले होते. ट्रम्प ट्विटरवर परत येणार का, असा प्रश्न जेव्हा जेव्हा मला कोणी विचारला असेल आणि त्या प्रत्येक प्रश्नाच्या मागे मला डॉलर मिळाला असता तर आज ट्विटरकडे भरपूर पैसा असता, असे ट्वीट एलॉन मस्क यांनी केले आहे. त्याच्या याच ट्वीटला देवेंद्र फडणवीस यांनी रिट्वीट केले आहे.

फडणवीसांचे रिट्वीट

मी आणि माझ्या पक्षाबाबत विरोधक आणि HMV कडून पसरवण्यात येणा-या प्रत्येक फेक नरेटिव्हसाठी जर मला एक रुपया मिळाला असता, तर आज भाजपने बक्कळ पैसा कमावला असता, असं फडणवीस यांनी मस्कच्या ट्वीटला रिट्वीट करत म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.