यंदाच्या दिवाळीत महाराष्ट्रात सर्वाधिक फटाक्यांची आतषबाजी

136

दिवाळी आता संपली आहे, कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळानंतर देशात निर्बंधमुक्त दिवाळी साजरी करण्यात आली. त्यामुळे साहजिकच फटाक्यांचाही उद्योग तेजीत होता. या वर्षी दिल्ली वगळता देशभरात तब्बल ६ हजार कोटी रुपयांची फटाक्यांची विक्री झाली. यात सर्वाधिक फटाके महाराष्ट्रात फोडण्यात आले.

मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्राचा सर्वाधिक सहभाग

या वर्षी तुलनेने फटाक्यांची विक्री जास्त होती. यंदा २०१६ आणि २०१९ प्रमाणे बिझनेस ट्रेंड पाहायला मिळाला. तमिळनाडू फायरवर्क्स अँड एमोर्सेस मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे (TANFAMA) अध्यक्ष गणेशन पंजूराजन यांनी सांगितले की, “सध्याची ६ हजार कोटी रुपयांची किरकोळ उलाढाल झाली. वर्ष २०१६ आणि २०१९ मध्ये हेच उलाढाल अनुक्रमे ४ हजार आणि ५ हजार कोटी होती, तर २०२१ आणि २०२२ मध्ये यापेक्षा कमीच होती. यंदा सर्वाधिक फटाक्यांची विक्री महाराष्ट्रात झाली. त्या पाठोपाठ उत्तर प्रदेश, बिहार आणि गुजरातमध्ये झाली. मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्राने एकूण फटाक्यांच्या उत्पादनातील मोठा हिस्सा विकत घेतला, असे गणेशन म्हणाले.

(हेही वाचा होळीबाबत ‘गुगल’चे पंचांग चुकले…)

सर्व फटाके पर्यावरणपूरक 

उत्पादन केलेले सर्व फटाके ग्रीन म्हणजे पर्यावरणपूरक होते. सर्वोच्च न्यायालय आणि सरकारी अथॉरिटीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार फटाक्यांचे उत्पादन करण्यात आले होते. तमिळनाडूच्या विरुधुनगर जिल्ह्यातील शिवकाशी हे फटाके उद्योगाचे राष्ट्रीय केंद्र आहे. अयान फायरवर्क्सचे व्यवस्थापकीय संचालक जी. अबिरुबेन म्हणाले की, ‘या वर्षी फटाक्यांची विक्री जोरदार झाली. यंदा आम्ही नियमांचे पालन करून ग्रीन फटाक्यांचे उत्पादन आणि विक्री केली. यामुळे विषारी वायू उत्सर्जनात 35 टक्के घट झाली आहे.’

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.