मुंबई बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाच्या कामांचा आढावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. यात एकूण १९५ चाळी मिळून १५ हजार ५९३ सदनिका निर्माण होणार आहेत. त्यामध्ये वरळी चाळीच्या विकासाचे काम सुरू झाले आहे. तर नायगाव चाळीच्या विकासाचे काम 1 जानेवारीपासून सुरू होणार आहे.
१५ प्रकल्पांचे लवकरच हस्तांतरण करण्याचे आदेश
पात्रतेचे विषय तातडीने निकाली काढा, जी तारीख ठरवाल त्या तारखेपर्यंत निर्णय झालेच पाहिजेत, अशी कामाची दिशा ठेवा. भाडे आधीच देऊन स्थलांतर करून तातडीने काम सुरू होतील, हे सुनिश्चित करा. कोविडसाठी ताब्यात घेतलेले निवारे रिकामे करा आणि स्थानांतराच्या कामाला वेग द्या. १५ प्रकल्पांचे लवकरच हस्तांतरण करा आणि यातील १० प्रकल्प आगामी ६ महिन्यात तयार होतील याकडे लक्ष द्या, असे निर्देश त्यांनी दिले. पोलिस स्थानके अद्ययावत करा आणि त्यातून रिकाम्या जागांचा विचार करून अगदी शक्य त्या ठिकाणी हाउसिंगची कामे सुद्धा करा असे आदेश देवेंद्र फडणवीसांनी दिले. यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिसांच्या घरांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतील बीडीडी चाळीत राहणाऱ्या पोलिसांना नाममात्र दरात घरे देण्यात येणार आहेत. बीडीडी चाळ पुनर्विकासात पोलिसांना १५ लाख रुपयांमध्ये घरे देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती.
(हेही वाचा होळीबाबत ‘गुगल’चे पंचांग चुकले…)