राज्यातील २ हजार ६०९ महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन करून घेतले नसल्याचे निदर्शनास आले आहे. संबंधित महाविद्यालयांना नॅक मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी उच्च शिक्षण संचालनालयाने सहा महिन्यांची मुदत दिली असून, या मुदतीत नॅक मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण न केल्यास कारवाई करण्याचा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
( हेही वाचा : मुंबई ते बेलापूर प्रवास होणार सुसाट! वॉटर टॅक्सी १५ दिवसात सुरू होणार; किती असणार भाडे?)
नॅक मूल्यांकन केले नाही तर कारवाई करण्याचा इशारा
गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन करून घेणे बंधनकारक आहे. नॅक मूल्यांकनाचे आतापर्यंत विविध टप्पे पूर्ण झाले आहेत. मात्र राज्यातील काही महाविद्यालयांकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे दिसून आले आहे. तसेच काही महाविद्यालयांनी एकदा नॅक मूल्यांकन करून घेतल्यानंतर पुनर्मूल्यांकन करून घेतलेले नाही. राज्यातील १ हजार ९९१ अनुदानित, विनाअनुदानित, शासकीय महाविद्यालयांनी आतापर्यंत एकदाही नॅक मूल्यांकन करून घेतलेले नाही. तर, ६१८ महाविद्यालये नॅक मूल्यांकनामध्ये सक्रिय नसल्याची नोंद उच्च शिक्षण संचालनालयाकडे आहे. या पार्श्वभूमीवर, उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांनी महाविद्यायालयांना नॅक मूल्यांकन करून घेण्यासंदर्भातील निर्देश परिपत्रकाद्वारे दिले. यानुसार नॅक मूल्यांकन केले नाही तर कारवाई करण्याचा इशारा उच्च शिक्षण संचालनालयाकडून देण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community