दादरच्या पश्चिम भागातील छबीलदास सभागृहामध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास एलपीजी गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट होऊन आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवाने यात कोणतीही जिवितहानी झाली नसल्याचे समोर आले आहे.
एकीकडे गॅस स्फोटाच्या घटना सातत्याने उघडकीस येत आहेत. दुसरीकडे अनेकदा गॅस लीक किंवा गॅसच्या चुकीच्या वापरामुळे अशा घटनांना सामोरे जावे लागत आहे.आता दादरमध्ये एलपीजी सिलिंडरचा स्फोट होऊन आग लागल्याची घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या आहेत. अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.
( हेही वाचा: अब्जावधी वर्षांपूर्वी मंगळावर होता मोठा महासागर, संशोधनातून माहिती समोर )
तीन जण जखमी
दादरमध्ये झालेल्या या एलपीजी सिलिंडर स्फोटामध्ये तीन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमींवर जवळील सायन रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरु आहेत. हा सिलिंडर स्फोट कशामुळे झाला याचा तपास स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी करत आहेत.
Join Our WhatsApp Community