पंढरपूर शहरात तब्बल 137 धोकादायक इमारती; पालिका प्रशासनाचे भाविकांना निवास न करण्याचे आवाहन

168

कार्तिकी यात्रा दोन दिवसांवरच आली असताना पंढरपूरमध्ये धोकादायक इमारतींना आता प्रशासनाने नोटीस देण्यास सुरुवात केली आहे. शहरात गेल्या अनेक वर्षांपासून अनेक धोकादायक इमारती असून या पाडण्यात अनेक अडचणी असल्याने प्रत्येक यात्रेपूर्वी अशा इमारतींना पालिका प्रशासन नोटीस देत असते. धोकादायक इमारती, मठ, जुने वाडे यामध्ये भाविक निवासास थांबल्यास मोठी दुर्घटना होऊ नये म्हणून ही खबरदारी घेतली जात आहे.

( हेही वाचा: Blue Tick: ट्वीटरवर ब्लू टिक असणा-यांना आता मिळणार ‘या’ खास सुविधा; मस्क यांची घोषणा )

( हे पाहा: मुस्लिमबहुल देश इंडोनेशियाच्या चलनावर गणपतीचे चित्र कसे? )

धोकादायक इमारती, मठ आणि वाडे यामध्ये कोणीही वास्तव्य करु नये

यावर्षी पाऊस चांगला होऊन परतीचा पाऊसही जोरात राहिल्याने या धोकादायक बनलेल्या जवळपास 137 इमारती अधिक धोकादायक बनल्या आहेत. धोकादायक इमारतीचा प्रश्न वर्षानुवर्षे हा न्यायालयामध्ये अडकल्या आहेत. धोकादायक इमारतीचा हा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. शहरातील या धोकादायक इमारतीचा प्रश्न सुटल्यास प्रदक्षिणा मार्ग आणि मंदिर परिसरातील या वास्तूंचा धोका वारक-यांना होणार नाही. सध्यातरी या धोकादायक इमारती, मठ आणि वाडे यामध्ये कोणीही वास्तव्य करु नये असे आवाहन पंढरपूर नगरपालिकेने केले आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.